महाड इमारत दुर्घटना Update: एकाचा मृत्यू तर JCBच्या मदतीने 8 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं

महाड इमारत दुर्घटना Update: एकाचा मृत्यू तर JCBच्या मदतीने 8 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं

या इमारतीच्या पहिला पिलर खचला तेंव्हा बहुतांश तरुण इमारतीच्या बाहेर पडले होते.

  • Share this:

रायगड, 24 ऑगस्ट : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळून (Mahad Building Collapsed) मोठी दुर्घटना घडली आहे. कारण या इमारतीमध्ये 60 पेक्षा अधिक फ्लॅट होते त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. तर जेसीबीच्या साह्याने 8 जणांना वाचविण्यात यश आलंय. बचाव पथकाने त्यांना ठिगाऱ्याखालून काढलं. जखमींवर उपचार करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीच्या पहिला पिलर खचला तेंव्हा बहुतांश तरुण इमारतीच्या बाहेर पडले अशीही माहिती आहे.

तारीक गार्डन असं या कोसळलेल्या इमारतीचं नाव आहे. महाड शहरातील काजळपुरा परीसरात ही इमारत होती. अनेक कुटुंबाचं वास्तव्य असलेली ही इमारत कोसळल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

NDRFच्या दोन टीम बचावकार्यासाठी रवाना झाल्या असून आणखी एक टीम पाठवण्यात येत आहे.

महाडमध्ये कोसळलेल्या तारीक गार्डन इमारतीचे युनुस शेख व पटेल हे ठेकदार होते. या इमारतीत एकूण 40 कुटुंब राहात होते. त्यातील 25 कुटुंब बाहेर पडले, पण 15 कुटुंब अडकल्याची शक्यता आहे. मदत कार्यासाठी तज्ज्ञांची गरज घ्यावी लागणार आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनासह स्थानिकांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.

काही तासापूर्वी इमारत हलत असल्याचं निदर्शनात आल्याने काही कुटुंब बाहेर पडली होती.

दरम्यान, मागच्या काही वर्षात या भागात सिंगल लोड बेअरिंग इमारतींचं प्रमाण वाढलं आहे. हा प्रकार जीवघेणा आहे आणि प्रशासनपण याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 24, 2020, 10:19 PM IST
Tags: raigad

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading