देव तारी त्याला कोण मारी.... काळा आला होता पण वेळ आली नव्हती...या म्हणीचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील महाड इमारत दुर्घटनेनंतर आला आहे. कारण बचावकार्य सुरू असताना NDRF च्या जवानांना या ढिगाऱ्याखालून 18 तासांनंतर सहा वर्षाच्या मुलाला बाहेर काढण्यात यश आलं आहे. या चिमुकल्या मुलाला ढिगाऱ्याखालून सुरक्षितपणे बाहेर काढून नंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महाड येथील तारिक गार्डन इमारत दुर्घटना मृत व्यक्तींचा तपशील :- 1)सय्यद अमित समीर, वय 45 वर्ष. 2) नविद झमाने, वय 35 वर्ष 3) नौसिन नदीम बांगी, वय 30 वर्ष 4) आदी हाशिम शैकनग, वय 16 वर्ष 5) अनोळखी स्री चा मृतदेह 6) रोशनबी देशमुख, वय 56 वर्ष 7) ईस्मत हाशिम शैकनक, वय 42 वर्ष 8) फातिमा अन्सारी, वय 40 वर्ष 9) अल्लतिमस बल्लारी, वय 27 वर्ष 10) शौकत आदम अलसूलकर, वय 50 वर्षमहाड दुर्घटना : 18 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 6 वर्षाच्या चिमुकल्याने सांगितला अनुभव pic.twitter.com/vbFh6TEpm2
— News18Lokmat (@News18lokmat) August 25, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raigad news