महाराष्ट्राचं मिनी काश्मिर गजबजलं; कोकण किनारेही घालताहेत पर्यटकांना भुरळ

महाराष्ट्राचं मिनी काश्मिर गजबजलं; कोकण किनारेही घालताहेत पर्यटकांना भुरळ

सलग सुट्ट्यांमुळे महाराष्ट्राचं मिनी काश्मिर म्हणजेच महाबळेश्वर पर्यटकांनी अक्षरश: गजबजून गेलय. तर पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या कोकणाच्या किनारपट्टीवर देखील पर्यटकांनी मोठी गर्दी केलीय.

  • Share this:

विकास भोसले, महाबळेश्वर, 10 नोव्हेंबर : दिवाळीच्या सुट्यांमध्ये पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाण गर्दी होतेय. सलग सुट्ट्यांमुळे महाराष्ट्राचं मिनी काश्मिर म्हणजेच महाबळेश्वर पर्यटकांनी अक्षरश: गजबजून गेलय. तर पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या कोकणाच्या किनारपट्टीवर देखील पर्यटकांनी मोठी गर्दी केलीय. राज्याचा पारा 40 ते 42 अंशावर गेला असताना थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या महाबळेश्वरला देशभरातील पर्यटकांनी पसंती दिलीये. देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येनं पर्यटनस्थळांना भेट देत आहेत.

सलग सुट्टयामुळे महाराष्ट्राचे मिनी काश्मिर असलेले महाबळेश्वर पर्यटकांनी अक्षरशा गजबजले आहे. राज्यभरात पारा ४० ते ४२ अंशावर गेला असताना थंड हवेच्या ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला देशभरातील पर्यटकानी पसंती दिलीय दिवाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वर हाउस फुल्ल झालय, भर उन्हात वेण्णा लेक बोटींगचा आनंद पर्यटक घेताहेत.

महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या या थंड हवेच्या निसर्गरम्य महाबळेश्वर अजुनही कुल असल्याने या पर्यटनस्थळी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. येथील प्रसिद्ध वेण्णालेक, केटस् पॉईंट, ऑर्थरसीट पॉईंट, क्षेत्र महाबळेश्‍वर, किल्ले प्रतापगड, लॅडवीक, विल्सन, मुंबई पॉईंट ही ठिकाणे गर्दीने अक्षरशः फुलली आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे वेण्णालेक गजबजुन गेला असून, पर्यटक बोटिंगचा आनंद घेताना दिसताहेत. त्याचबरोबर पर्यटक गरमागरम मका, स्ट्रॅाबेरी आणि गाजराचा मनमुराद आस्वाद घेताना पर्यटक दिसून येताहेत. पालिकेकडून पार्किंगची सोय करण्यात आली असली तरी वेण्णालेकसह काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत आहे. मात्र पोलीस प्रशासन स्वतंत्र वाहतूक शाखेच्या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

मुख्य बाजारपेठा सजल्या असून मोठ्या प्रमाणावर पर्यटक खरेदीसाठी येत आहेत. बाजारपेठेतील प्रसिद्ध चप्पल, चणे, जाम, जेली, थंडगार गोळा खरेदीसाठी गर्दी होत आहे. पर्यटकांची विशेष खबरदारी म्हणुन महाबळेश्वर नगरपालिकेने संपूर्ण शहरात CCTV कॅमेरे बसविले आहेत. गुन्हेगारीवर आळा आणि पर्यटकाना विशेष सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने या सर्व व्यवस्था करण्यात आल्या असल्याची माहिती महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे आणि मुख्याधिकारी अमिता दगडे यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

समुद्रसपाटीपासुन ४५०० फुट उंचीचर असलेल्या महाबळेश्वर मध्ये दर वर्षी 15 ते 18 लाख पर्यटक येतात. यापुढेही आता पर्यटक वाढणार असल्याने शहरातील अंतर्गत वाहतुकीचा व पार्कींगचा प्रश्न भेडसावणार आहे. पोलिस व प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोकण किनारेही घालताहेत पर्यटकांना भुरळ

कोकतील ताजे मासे, हापुस आंबा, मोहराचा दरवळणारा सुगंध, विलोभनिय समुद्र किनारे हे सार काही डोळ्याच पारणे फेडनारं. कोकणातील निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी आणि समुद्राचा मनमुराद आंनद लूटण्यासाठी पर्यटक कोकण किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. त्यामुळे गोवा ते मुंबई दरम्यानचे सर्वच बीच पर्यटकांनी गजबजुन गेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनारा स्वच्छ सूंदर सुरक्षित असल्याने या समुद्र कीनाऱ्याला पर्यटक सर्वाधिक पसंती देतात. मुरुड समुद्र कीनाऱ्यावरील घोड़ा गाड़ी, ऊंट सफर, अक्वा स्पोर्ट, विविध प्रकारचे खेळ असल्याने पर्यटकांची खास गर्दी पाहायला मिळत आहे. तर कुटुंबासह समुद्र किनारी जाणाऱ्यांसाठी मुरुड समुद्र किनारा सुरक्षित असल्याने याठिकाणीही लोकं करताहेत.

 PHOTOS : लग्नानंतर अवघ्या दोन तासात नवदाम्पत्याचा मृत्यू

First published: November 10, 2018, 9:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading