काश्मीर नव्हे हे आहे महाबळेश्वर, VIDEO पाहून भरेल हुडहुडी

काश्मीर नव्हे हे आहे महाबळेश्वर, VIDEO पाहून भरेल हुडहुडी

महाबळेश्‍वरमध्ये थंडीचा कडाका वाढला असून, या मिनी काश्मीरमध्ये दवबिंदू गोठल्याचं बुधवारी पहावयास मिळालं.

  • Share this:

विकास भोसले ,सातारा, 13 डिसेंबर : काश्मीर नव्हे हे आहे महाराष्ट्राचं नंदनवन आहे. महाबळेश्‍वरमध्ये थंडीचा कडाका वाढला असून, या मिनी काश्मीरमध्ये दवबिंदू गोठल्याचं बुधवारी पहावयास मिळालं. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक, लिंगमळा परिसरात बुधवारी किमान तापमान ६ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं.

महाबळेश्‍वर शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे आणि सृष्टीसौंदर्य पाहण्याचा आनंद पर्यटकांना मिळत आहे. किमान तापमान 6 अंशापर्यंत खाली आल्यामुळे वेण्णालेक, लिंगमळा परिसरात हिमकण जमले आहेत. तर निसर्गाचं हे आगळं-वेगळं रुप बघण्यासाठी पर्यटकांची पावलं महाबळेश्‍वरकडे वळताहेत.

पर्यटकांची गर्दी वाढत असल्यामुळे महाबळेश्‍वरातल्या मुख्य बाजारपेठेला एक वेगळीच रंगत आल्याचं पहावयास मिळेत आहे. बाजारपेठेत फिरताना पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करून फेरफटका मारताना दिसून येत आहेत. तर, थंडीचे प्रमाण अधिक असल्याने रात्रीला जागोजागी शेकोट्या पेटत असल्याचं दृश्य पहावयास मिळत आहे.

नाशिक आणि औरंगाबाद गारठलं; राज्यात हु़डहुडी आणखी वाढणार

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा चांगलाच वाढला आहे. गेल्या 24 तासात नाशिक येथे सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली. नाशिकचा पारा 9.6 अंशापर्यंत खाली आला होता. तर, त्याच खालोखाल औरंगाबदेत 9.8 अंश सेल्सीयस किमान तापमान नोंदविल्या गेलं. राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तापमान १० अंशांच्या खाली घसरल्याने नाशिक, औरंगाबादसह नगरचं तापमान आणखी खाली घसरून बुधवारी (ता. १२) हंगामातील नीचांकी ८.२ अंशांवर आलं. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ८.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. जळगाव, पुणे, नागपूरचं किमान तापमानसुद्धा 10 अंशाच्या जवळपास होतं. बुधवारी जळगावात 10, पुण्याचं 10.5 तर नागपूरात 10.9 अंशा सेल्सीयस किमान तापमानाची नोंद झाली.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान होतं. कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, गडचिरोलीसह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावल झाला. पावसाला पोषक हवामान निवळल्यामुळे राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. किमान तापमानात घट झाल्यामुळे गारढा वाढायला पुन्हा सुरूवात झाली आहे. राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास असून, बुधवारी काही ठिकाणी 1 ते 5 अंशांची घट झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ककंचित घट झाली आहे. राज्याच्या ककमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

VIDEO : 102 वर्षांच्या आजीबार्इंनी केलं 14 हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग!

First published: December 13, 2018, 9:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading