मुंबई, 31 ऑगस्ट : महाराष्ट्रात ऐतिहासिक असं तीन भिन्न विचारांचं सरकार स्थापन काय झालं राज्यातील राजकारणाला वेगळंच वळण लागलं आहे. यामुळे विरोधी पक्ष भाजप आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी सुरू आहे. अशात महाविकास आघाडी सरकारचं आणखी एक नाराजी नाट्य पाहायला मिळतं आहे. आता ही नाराजी पुन्हा एकदा जाहीररित्या व्यक्त करण्यात आली आहे. ठाकरे सरकारची वचनपूर्ती म्हणत ठाण्यात एक बॅनर लावण्यात आले आहे. पण यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यावर काँग्रेस मात्र खवळली आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर हे सरकार सत्तेवर आलं असतं का? असा संतप्त सवाल शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी विचारला आहे. सरकार तिघांचं मग नाव फक्त दोघांचे का ? असा सवाल काँग्रेसने या पोस्टरमधून विचारला आहे.
राज्यात पुढचे 24 तास हलका व मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
शिवसेना-राष्ट्रवादीच्या बॅनर शेजारीच काँग्रेसने हे बॅनर भरचौकाच लावलं असल्याने महाविकास आघाडीतील मतभेद हे शब्दश: चव्हाट्यावर आले आहेत असंच म्हणावं लागेल. यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी तुमच्या तीन पक्षांच्या आपापसातील भांडणांमध्ये महाराष्ट्राचे वाटोळं केलं अशी टीका केली आहे.
ठाण्यात #कांग्रेसची पोस्टरबाजी
सरकार तिघांचं मग नाव का फक्त दोघांचं..? असे सवाल ठाणे काँग्रेसने लावलेल्या बॅनरवर विचारण्यात आलेत. तुमच्या तीन पक्षाच्या आपसातील भांडणांमध्ये महाराष्ट्राचं वाटोळं केलंत @INCMaharashtra @MumbaiNCP @ShivsenaComms pic.twitter.com/ZKwEeBfSjM
— Ram Kadam (@ramkadam) August 31, 2020
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातलं अतर्गत राजकारण वारंवार समोर येत आहे. यावर राज्यातील काँग्रेस नेते काँग्रेस अध्यक्षांवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून सामनातूनही काँग्रेसवर टीका करण्यात आली होती. अशात भाजप सत्ताधाऱ्यांवर निशाणा शोधण्यासाठी टपून असताना ही बॅनरबाजी म्हणजे त्यांच्या हाताता आयतं कोलीत दिल्यासारखं आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेबरोबरच सत्तेत सहभागी आहे. याचीच खंत काँग्रेस काही नेत्यांमध्ये असल्याचं वारंवार समोर येत आहे. शिवसेनेसोबत गेल्याने काँग्रेसच्या आयडोलॉजीचं काय? असे प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत. यावरूनच काहींना काँग्रेसला नवसंजीवनी द्यायची नाही आहे आणि नवं नेतृत्व निर्माण होऊन द्यायचं नाही अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.
बहिणीच्या 13 दिवसांच्या लेकीला भावानेच संपवलं, कारण पाहून पोलीसही हैराण
मागील आठवड्यामध्ये काँग्रेसमधील 23 वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित करत पत्र प्रपंच केला होता. यावर याआधीच 'सामना'च्या अग्रलेखातून राऊत यांनी कडवट टीका केली होती. आज पुन्हा एकदा लेखाच्या माध्यमातून राऊत यांनी ज्या 23 नेत्यांनी पत्रप्रपंच केला. त्यापैकी काहींना अध्यक्ष व्हावे असं वाटत असावं पण त्यांच्यात एका मध्येही राष्ट्रीय नेतृत्व करावं अशी ताकद आणि कुवत नाही अशी बोचरी टीका केली होती.