मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'हा धक्काही नाही, दिलासाही नाही, फक्त...', सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काय म्हणाले आदित्य ठाकरे

'हा धक्काही नाही, दिलासाही नाही, फक्त...', सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काय म्हणाले आदित्य ठाकरे

 महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे, यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 27 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून कोर्टात मांडण्यात आली, पण ठाकरे गटाची ही मागणी कोर्टाने फेटाळून लावली. तसंच शिवसेना कुणाची आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं? याबाबत निवडणूक आयोगाने पुढच्या प्रक्रियेला सुरूवात करावी, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आता..

सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय म्हणजे शिंदे गटाला दिलासा असल्याचं मानलं जात आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठीही आम्ही तयार आहोत. लोकशाही आणि संविधानासाठी हा लढा महत्त्वाचा ठरेल,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.

'हा धक्का नाही तसंच दिलासाही नाही, फक्त युक्तीवादाचं कोर्ट बदललं आहे. सुप्रीम कोर्टाकडून इलेक्शन कमिशनकडे हे प्रकरण गेलं आहे. आमचा लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, आम्ही सत्यासाठी लढत राहणार,' अशी वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

शिंदे गटाला 'सुप्रीम' दिलासा, धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगात आता अशी होणार लढाई

First published:

Tags: Aaditya Thackeray, Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray