राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यावर मोठी जबाबदारी, थेट ज्योतिरादित्य शिंदेंना देणार आव्हान

राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यावर मोठी जबाबदारी, थेट ज्योतिरादित्य शिंदेंना देणार आव्हान

मध्य प्रदेशमध्ये हातातून सरकार गेल्यामुळे काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

  • Share this:

वर्धा, 04 ऑक्टोबर : मध्य प्रदेशमध्ये हातातून सरकार गेल्यामुळे काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी  काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत सुनील केदार यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांची नियुक्तीची घोषणा केली आहे.

...तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू, बच्चू कडूंचे मोठे विधान, पाहा हा VIDEO

मध्य प्रदेशमधील मुरैना आणि ग्वाल्हेर या दोन्ही जिल्ह्यांचे निवडणूक समन्वयक म्हणून सुनील केदार हे काम पाहणार आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांना सुनील केदार हे आव्हान देणार आहे.

दिग्विजय सिंह यांची कन्या आणि राष्ट्रीय नेमबाज श्रेयसीचा आज भाजप प्रवेश

सुनील केदार हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहे. नागपूरच्या सावनेर मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहे.  अलीकडे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुनील केदार यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली होती.

...जेव्हा सुनील केदार यांनी पक्षातील नेत्यांना सुनावले

काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष निवडीवरून मोठे नाट्य घडले होते.  काँग्रेसच्या एकूण 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहलं आणि अध्यक्ष बदलाची मागणी केली होती. त्यावेळी 'संपूर्ण पक्ष सोनिया गांधी यांच्या पाठिशी आहे. अशात गांधी कुटुंबाच्या कामावर मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी प्रश्न उपस्थित करणं ही लाजिरवाणी बाब आहे. या नेत्यांनी त्यांनी केलेल्या कृत्यावर तातडीने माफी मागावी. असं झालं नाही तर काँग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात कुठेही फिरकू देणार नाही, असा इशाराचा सुनिल केदार यांनी दिला होता.

पुणेकरांसमोर उभे ठाकले नवे संकट, धक्कादायक VIDEO आला समोर

सुनील केदार यांच्या विधानावरून काँग्रेसमध्ये वाद पेटला होता. परंतु, काँग्रेस अध्यक्षपदी सोनिया गांधी या कायम राहणार असल्याचा निर्णय घेतल्यानंतर हा वाद शमला होता.

Published by: sachin Salve
First published: October 4, 2020, 2:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या