भाजपमध्ये बाहेरच्या शक्तीकडून फूट पाडण्याचा प्रयत्न, भाजप आमदाराने केलं पंकजा मुंडेंचं समर्थन

भाजपमध्ये बाहेरच्या शक्तीकडून फूट पाडण्याचा प्रयत्न, भाजप आमदाराने केलं पंकजा मुंडेंचं समर्थन

मुळात बाहेरच्या माणसाने भाजपचा अंतर्गत बाबींवर बोलू नये, असा सणसणीत टोलाही मिसाळ यांनी काकडेंना लगावला.

  • Share this:

पुणे, 13 डिसेंबर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून भाजपमध्येच राहुन काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थनात आता भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ मैदानात उतरल्या आहे.  भाजपमध्ये काही शक्ती फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा खुलासा मिसाळ यांनी केला.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली खदखद अखेर बोलावून दाखवली. त्यानंतर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मुठभर पक्ष सांभाळता येत नाही, अशी टीका केली होती. पुणे भाजपच्या शहराध्यक्षा आणि  आमदार माधुरी मिसाळ यांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संजय काकडेंवर टीकाही केली.

'भाजपची पाच वर्ष सत्ता होती. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष पक्षासाठी काम केलं. त्यांनी सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम केलं.  पण काही शक्ती या पक्षाच्या नेतृत्वामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना काय पोळी भाजायची असेल ते त्यांनाच माहिती आहे, अशी टीका मिसाळ यांनी केली.  भारतीय पक्षाचं विभाजन व्हावं आणि महाविकासआघाडीला फायदा व्हावा, अशी शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संजय काकडे यांच्या विधानाचा माधुरी मिसाळ यांनी निषेध केला. संजय काकडे यांनी जे काही आरोप केले आहे, ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही, मुळात बाहेरच्या माणसाने भाजपचा अंतर्गत बाबींवर बोलू नये, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा यांनी नेतृत्त्व केलं आहे. त्यांनी पक्षासाठी मोठं काम केलं आहे. पंकज यांनी गोपीनाथ प्रतिष्ठानद्वारे काम करण्यात काहीच गैर नाही. मीही सतीश मिसाळ प्रतिष्ठानद्वारे काम केलं आहे, असंही मिसाळ यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते संजय काकडे?

, 'पंकजा मुंडें यांनी भरवलेल्या मेळाव्यामुळे पक्षाला कोणताही धोका होणार नाही. ज्याला स्वत:चा मुठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही. त्याच्यामुळे पक्षाला काय धोका होणार' अशा शब्दात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला.

तसंच 'पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी पक्षात काही काम केलं नाही. त्यांना साधा त्यांचा मतदारसंघ सांभाळता आला नाही. त्यांना एवढी पदं देऊन 30 हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे त्यांनी पक्षाला याचा दोष देऊ नये' असंही संजय काकडे म्हणाले.

गोपीनाथ मुंडे हे अवघ्या देशाचं नेतृत्त्व आहे. पण पंकजा मुंडेंनी जातीपातीचं राजकारण केलं. 5 वर्षांत पंकजांनी ओबीसींना सांभाळलं नाही. 5 वर्ष सत्तेत होत्या तरी कामं का केली नाहीत? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2019, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading