Home /News /maharashtra /

मध्यरात्री 5 दरोडेखोर घरात घुसले, मुलाच्या गळ्याला चाकू लावून लाखो रुपयांची लूट

मध्यरात्री 5 दरोडेखोर घरात घुसले, मुलाच्या गळ्याला चाकू लावून लाखो रुपयांची लूट

आरडाओरडा केल्यास दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दरोडेखोरांनी दिली होती.

  वीरेंद्रसिंह उत्पात, माढा, 22 जानेवारी : माढ्यात बुधवारी (22 जानेवारी) पहाटे कुमार चवरे आणि मिठू वाघ यांच्या घरावर दरोडा टाकून सुमारे 16 तोळे सोने आणि रोख रक्कम असा ऐ्वज दरोडेखोरांनी चोरला. या प्रकारात एक महिला जखमी झाल्याची माहिती माढ्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांनी दिली आहे. तसंच याबाबत माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास स्वेटर आणि काळी पँट घातलेले 30 ते 35 वयोगटातील पाच अज्ञात दरोडेखोर चवरे यांच्या घरात घुसले. चोरट्यांचा आवाज ऐकून घरातील महिला जागी झाली. त्यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्या मुलाच्या आणि पतीच्या गळ्याला चाकू लावला. आरडाओरडा केल्यास दोघांनाही जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली व घरातील सोने, रोख रक्कम चोरली. दरोडेखोरांचा पाठलाग करताना एक महिलेला त्यांनी मारहाण करुन जखमी केले. पंढरपूर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, वडिलांचा खून करून मुलगा वारीला निघून गेला! दुसरीकडे, मिठू वाघ यांच्या कुर्डुवाडी रस्त्यावरील रोकडोबा मंदिराशेजारील घरातील रोख रक्कम आणि अंदाजे दोन तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले आहे. याबरोबर माढयातील सराफ गल्लीतही चोरीचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत माढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. चोरीस गेलेले सोने व रोख याबाबत नेमकी माहिती पोलीस घेत आहेत. वडिलांचे हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप, तरीही पोलिसांनी गाठला हलगर्जीपणाचा कळस दरम्यान, परिसरात घडलेल्या दरोड्याच्या विविध घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे दरोडेखोरांना लवकरात लवकर बेड्या ठोकून नागरिकांना दिलासा देण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर निर्णाण झालं आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Crime news, Madha

  पुढील बातम्या