चंद्रपूर, 15 जुलै- घुग्गुस शहरापासून जवळच असलेल्या पांढरकवडा गावाच्या हद्दीत प्रेमीयुगुलाचे मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघेही विवाहित होते. या दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तरूण नागपूरचा तर तरुणी घुग्गुस येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी दिवस उजाडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. राजेश आणि सुनीता अशी मृतांची नावे आहेत, शेतशिवारातीस लिंबाच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत दोघांची मृतदेह आढळून आले. या प्रकरणी घुग्गुस पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. रविवारी (14 जुलै) रात्री राजेश हा चंद्रपुरात होता. सुनीताने त्याला चंद्रपुरात भेटली. नंतर ती घुग्गुस येथे परत आली. राजेश हा रात्री 10.30 वाजता दुचाकीने पांढरकवडा येथे आला. त्याने सुनीतालाही तिथे बोलावले. दोघांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेतला असावात. राजेशची दुचाकी घटनास्थळी आढळून आली आहे.
असा झाले परिचयाचे प्रेमात रूपांतर..
विशेष म्हणजे राजेश आणि सुनीता दोघेही विवाहित आहेत. दोघांनाही आपापली स्वतंत्र कुटुंबे आहेत. या दोघांची नागपुरात ओळख झाली होती. नंतर परिचयाचे प्रेमात रूपांतर झाल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या
मुंबईतील घाटकोपर पश्चिमेला रविवारी रात्री महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांना सोमवारी (15 जुलै) अटक केली आहे. आरोपी राजकुमार चौरासीया यानेच आपल्या पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मीनाक्षी चौरासिया असे मृत तरुणीचे नाव आहे. मीनाक्षी ही 4 महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे ऑनर किलिंगचा हा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मिळालेली माहिती अशी की, घाटकोपरच्या नारायण नगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर मीनाक्षीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. काही रिक्षा चालकांना हा मृतदेह फुटपाथवर आढळला होता. माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदसाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला होता. घटनास्थळी पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग यांनीही पाहणी केली होती. दरम्यान, शुक्रवारी (12 जुलै) रात्री देखील घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरूणाची हत्या झाली होती. सलग दुसरी हत्येची घटना समोर आल्याने घाटकोपर हादरून गेले आहे.
VIDEO:मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम