मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आई.. माझं आणि बाळु काकाचं काहीच नव्हतं, अल्पवयीन तरुणीसह विवाहित तरुणाची आत्महत्या

आई.. माझं आणि बाळु काकाचं काहीच नव्हतं, अल्पवयीन तरुणीसह विवाहित तरुणाची आत्महत्या

'आई, माझे आणि बाळु काकाचे काहीच नव्हते, आम्ही फक्त फोनवर बोलत होतो. मात्र, शेजारचे बेंद्रे सरांनी आमचे सार्‍या गावात केले.'

'आई, माझे आणि बाळु काकाचे काहीच नव्हते, आम्ही फक्त फोनवर बोलत होतो. मात्र, शेजारचे बेंद्रे सरांनी आमचे सार्‍या गावात केले.'

'आई, माझे आणि बाळु काकाचे काहीच नव्हते, आम्ही फक्त फोनवर बोलत होतो. मात्र, शेजारचे बेंद्रे सरांनी आमचे सार्‍या गावात केले.'

बीड,20 जानेवारी: गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्यामल भरत चांभारे (वय-16) आणि बाळू विठोबा जाधव (वय-29)अशी मृत तरुणी आणि तरुणाचे नाव आहे. दोघांचे मृतदेह जातेगाव येथील खोपटी तांडा कॅनल रोडवरील एका विहिरीत आढळू आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शामल आणि बाळूने प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे.

सुसाईड नोटमध्ये मास्तरांचं नाव!

मिळालेली माहिती अशी की, रविवारी दुपारी 12 वाजता श्यामल चांभारे आणि बाळू जाधव या दोघांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. पोलिसांच्या उपस्थितीत दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. श्यामलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीत गावातील एका शिक्षकाचे नावाचा उल्लेख आहे. 'आई, माझे आणि बाळु काकाचे काहीच नव्हते, आम्ही फक्त फोनवर बोलत होतो. मात्र, शेजारचे बेंद्रे सरांनी आमचे सार्‍या गावात केले.' असा मजकूर या चिठ्ठीत लिहिला आहे. दुपारी बारा वाजता श्यामल चांभारे यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला तर काही वेळापूर्वी त्याच विहिरीतून बाळू जाधव याचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

वडिलांनी 15 हजारांसाठी केली मुलाची हत्या

दुसरीकडे, अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आपोती बु. येथे वडिलांनी मुलाचा खून केल्याची घटना घडलीय. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. वडिलांनी पैशाच्या वादातून मुलावर कुऱ्हाडीचे घाव घातले आणि हत्या केली. आरोपी वडीलास बोरगाव मंजू पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.अकोल्यातील सचिन उर्फ कोरकुल उर्फ बॉक्सर भिमराव पळसपगार वय (25) हा त्याच्या वडिलांकडे कायम पैशाचा तगादा लावत असे. घटनेच्या दिवशी त्याने वडील भीमराव रंगराव पळसपगार (59) यांचेकडे 15,000 रुपयाची मागणी केली होती.

ही रक्कम मुलीच्या लग्नासाठी लावून ठेवल्याचे वडिलांनी सांगीतले. कापूस आल्यानंतर पैसे देतो असे वडिलांनी सांगितले. परंतु पैसे न दिल्याने सचिनचा पारा चढल्याने वडील आणि मुलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. सचिन हा वडील, सावत्र आई, व बहिणीच्या अंगावर धावून शिवीगाळ करीत हाणामारी व जीव घेण्याची धमकी देत होता. या आधीही त्याने अशाच प्रकारे भांडण केलं होतं. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून रागाच्या भरात आरोपी वडील भिमराव पळसपगार यांनी सचिनच्या चेहरा व डोक्यावर, अंगावर कुऱ्हाडीने घाव घालीत सचिनला यमसदनी धाडले.

गावचे पोलीस पाटील बळीराम सिरसाट यांना माहिती मिळताच सचिनला घेऊन अकोला सर्वोपचार रुग्णालय गाठीले परंतु सचिनचा घटना स्थळीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलीसांना मिळताच त्यांनी अकोला सर्वोपचार रुग्णालय गाठीत आरोपी वडील भिमराव पळसपगार यांना ताब्यात घेतलं. आरोपी वाडीलांने गुन्हा कबुल केला आहे.

First published:

Tags: Beed crime news, Beed police, Beed suicide, Maharashtra news