मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /प्रेयसीच्या घरात रात्री सापडला प्रियकर, नातेवाईकांनी कुऱ्हाडीने केली निर्घृण हत्या

प्रेयसीच्या घरात रात्री सापडला प्रियकर, नातेवाईकांनी कुऱ्हाडीने केली निर्घृण हत्या

ज्ञानेश्वरचे मागील दोन वर्षांपासून घराशेजारील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ज्ञानेश्वर हा त्याच्या प्रेयसीच्या घरात सापडल्याने त्याला प्रेयसीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली.

ज्ञानेश्वरचे मागील दोन वर्षांपासून घराशेजारील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ज्ञानेश्वर हा त्याच्या प्रेयसीच्या घरात सापडल्याने त्याला प्रेयसीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली.

ज्ञानेश्वरचे मागील दोन वर्षांपासून घराशेजारील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ज्ञानेश्वर हा त्याच्या प्रेयसीच्या घरात सापडल्याने त्याला प्रेयसीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली.

बुलडाणा,6 फेब्रुवारी:संग्रामपूर तालुक्यातील सावळा येथील एका तरुणावर डोक्यात कुऱ्हाड टाकून हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. लाकडी दांड्याने आणि काठीच्या सहाय्याने ही घटना बुधवारी रात्री घडली. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. याप्रकरणी तरुणाच्या प्रेयसीच्या आठ नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून सहा आरोपी फरार आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सावळा येथील घडलेल्या घटनेची मिळालेली माहितीनुसार, ज्ञानेश्वर देवेंद्र घिवे (वय-35,रा.सावळा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वरचे मागील दोन वर्षांपासून घराशेजारील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ज्ञानेश्वर हा त्याच्या प्रेयसीच्या घरात सापडल्याने त्याला प्रेयसीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. ज्ञानेश्वरवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. गुरुवारी सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

फिर्यादी देवेंद्र रामनाथ घिवे (रा.सावळा) याच्या फिर्यादीवरून आरोपी प्रभाकर महादेव धुळ, गजानन महादेव धुळ,अजाबराव महादेव धूळ, गणेश प्रभाकर धुळ, प्रकाश गजानन धुळ, रामराव अजाबराव धुळ, विठ्ठल अजाबराव धुळ, ज्ञानेश्वर मनोहर धुळ (सर्व रा. सावळा, ता. संग्रामपूर) यांच्याविरोधात तामगाव पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मृत ज्ञानेश्वर घिवे याचे आरोपी प्रभाकर धूळ यांच्या मुलीसोबत मागील 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ज्ञानेश्वर रात्री प्रेयसीला भेटायला गेला होता. तो आणि त्याची प्रेयसी रात्री घरात एकत्र सापडल्याने मुलीच्या नातेवाईकांनी त्याला घरातून बाहेर काढत कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. ज्ञानेश्वरला गंभीर जखमी अवस्थेत शेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. परंतु उपचार सुरू असताना ज्ञानेश्वरचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. मुलीच्या वडिलांसह आठ नातेवाईकांनी ज्ञानेश्वरची निर्घृण हत्या केल्याचा आरोप देवेंद्र रामनाथ घिवे यांनी केला आहे. पोलिसांनी त्यानुसार आठ जणांविरुद्ध भादंवि कलम 302,143,147,148,149 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गणेश प्रभाकर धूळ आणि ज्ञानेश्वर प्रभाकर धूळ या दोन आरोपींना अटक केली असून सहा आरोपी अद्याप फरार आहेत. तामगांव पोलिस स्टेशनचे एस.आर. विखे पुढील तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Buldana, Maharashtra news