मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मारहाण झालेल्या 'त्या' प्रेमी युगुलाबाबत धक्कादायक माहिती आली समोर

मारहाण झालेल्या 'त्या' प्रेमी युगुलाबाबत धक्कादायक माहिती आली समोर

बुलडाणा जिल्ह्यातील एक प्रेमीयुगुल हे जालना जिल्ह्यात फिरायला गेलं असताना गोंदेगाव येथील काही तरुणांनी या प्रेमीयुगुलाची छेड काढत बेदम मारहाण केली होती.

बुलडाणा जिल्ह्यातील एक प्रेमीयुगुल हे जालना जिल्ह्यात फिरायला गेलं असताना गोंदेगाव येथील काही तरुणांनी या प्रेमीयुगुलाची छेड काढत बेदम मारहाण केली होती.

बुलडाणा जिल्ह्यातील एक प्रेमीयुगुल हे जालना जिल्ह्यात फिरायला गेलं असताना गोंदेगाव येथील काही तरुणांनी या प्रेमीयुगुलाची छेड काढत बेदम मारहाण केली होती.

बुलडाणा,5 फेब्रुवारी:जालना जिल्ह्यातील गोंदेगाव येथे बुलडाणा जिल्ह्यातील प्रेमीयुगुलास मारहाण करण्याची घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या प्रेमी युगुलाने लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील एक प्रेमीयुगुल हे जालना जिल्ह्यात फिरायला गेलं असताना गोंदेगाव येथील काही तरुणांनी या प्रेमीयुगुलाची छेड काढत बेदम मारहाण केली होती. एवढेच नाही तर मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या घटनेने सर्व स्तरातून रोष व्यक्त करण्यात आला आणि त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ अटक केली होती. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने आता या प्रेमीयुगुलाने सोमवारी मेहूना राजा येथे मंदिरात लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. तसे त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पीडित मुलगा- मुलगी ही देऊळगाव राजा तालुक्यातील असून मुलगी ही फार्मसी कॉलेजला प्रथम वर्षाला शिकत आहे. तर मुलगा हा अकोला येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

चारही नराधमाच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ..

जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील प्रेमी युगुल मारहाण व विडिओ क्लिप प्रकरणातील चारही नराधमाच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. या आरोपीची चार दिवसाची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना मंगळवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान, तालुका जालना पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींवर IT कायद्याची कलम वाढ करून तपास सहाययक पोलिस निरीक्षक ऐवजी पोलिस निरीक्षक गंदम यांच्याकडे सुपुर्द केला. ज्यामुळे आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले इतर मोबाइल व त्यांच्या हेतूबाबत तपास करण्यासाठी पोलिसांनी 5 दिवसांच्या वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली. दरम्यान तिसरे दिवाणी न्यायाधीश एम. एन. जैस्वाल यांच्या कोर्टाने चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत एक दिवस वाढविण्याचा निर्णय दिला. दरम्यान, मंगळवारी देखील आरोपींचा वकीलपत्र घेण्यास सर्व वकिलांनी नकार दिल्यानं अखेर विधी सेवा प्राधिकरण मार्फत अॅड.राहुल चव्हाण यांनी आरोपींचा कामकाज पहिले.

First published:
top videos

    Tags: Latest news