खळबळजनक! प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

Couple suicide: हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Couple suicide: हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

  • Share this:
बीड, 22 जुलै : काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर (Kolhapur) येथून उत्रेश्वर पिंपरी (Utreshwar Pimpri) येथे आलेल्या प्रेमी युगुलांनी आत्महत्या (Lover couple suicide) केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. प्रथम प्रेयसीने आणि त्यांनतर प्रियकराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समजू शकले नाहीये. आकाश शिवाजी धेंडे आणि सावित्री अशी मृतांची नावे आहेत. बीड जिल्ह्यातील (Beed district) केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील आकाश शिवाजी धेंडे हा त्याच्या आई वडिलांसह कोल्हापूर येथे रामनगर भागात मजुरीचे काम करत असे. दरम्यान, घराशेजारी राहत असलेल्या दोन मुलींची आई असलेल्या सावित्री या विधवा महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. तीन महिन्यांपूर्वी आकाश आणि सावित्री उत्रेश्वर पिंपरी येथे आले. आईच्या अपघाताची बतावणी करत रुग्णालयात बोलवलं; दिवसाढवळ्या केलं तरुणीचं अपहरण मंगळवारी आकाश घराबाहेर गेल्यानंतर सावित्रीने घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश घरी परतल्यानंतर त्याला हा प्रकार दिसून आला. त्याने सावित्रीचा गळफास सोडून तिला खाली घेतले. शेजारील वयोवृद्ध महिलेस बोलावून घेतले असता त्यांनी सावित्री मृत झाल्याचे आकाशला सांगितले. सदर महिला तेथून निघून गेल्यानंतर मंगळवारी रात्रीच आकाशने ही घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे आणि बिट अंमलदार अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
Published by:Sunil Desale
First published: