लग्नासाठी पाहायला येणार होते पाहुणे, त्याआधीच तरुणीनं प्रियकरासोबत केली आत्महत्या!

लग्नासाठी पाहायला येणार होते पाहुणे, त्याआधीच तरुणीनं प्रियकरासोबत केली आत्महत्या!

कावेरीला लग्नासाठी पाहाण्यासाठी पाहुणे येणार होते. अशी माहिती समोर आली आहे.

  • Share this:

बीड, 1 सप्टेंबर: गेवराई तालुक्यातील माटेगाव शिवारातील एका विहिरीमध्ये दोन मृतदेह तरंगताना आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. चकलांबा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढले आहेत.

मृताची ओळख आहे. शुभम कापसे (वय-18, रा. भाट अंतरवाली) आणि कावेरी खंदारे (वय-18, रा. पाथरवाला खुर्द, हल्ली मुक्काम माटेगाव) अशी मृत तरुण-तरुणीचं नाव आहे. शुभम आणि कावेरीनं प्रेम प्रकरणातून आत्महात्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा...आमचं 3 लाख रुपये लाईट बिल कमी करता मग सर्व सामन्यांचं का नाही, भाजप आमदाराचा सवाल

तीन दिवसांपासून दोघं होती बेपत्ता..

मिळालेली माहिती अशी की, शुभम आणि कावेरी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत चकलांबा पोलिस स्टेशनमध्ये दोघांच्या नातेवाईकांनी मिसिंग तक्रार दाखल नसल्याचे समजत आहे. या बाबत पोलीस तपास करीत आहे. शुभम आणि कावेरीचं एकमेकांवर प्रेम असून त्यांच्या घरच्यांनी ते मान्य नसावे, यामुळे दोघांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहेय. पोलिसांनी विहिरीत दोन्ही मृतदेह बाबर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे.

लग्नासाठी पाहायला येणार होते पाहुणे...

कावेरीला लग्नासाठी पाहाण्यासाठी पाहुणे येणार होते. अशी माहिती समोर आली आहे. मात्र, कावेरीचं शुभववर प्रेम होत. त्यामुळे ती आणि शुभम गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता होते. दोघांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते.

हेही वाचा...लज्जास्पद घटना! रुग्णालयाचं बिल दिलं नाही म्हणून डॉक्टरांनी बाळाचा केला लिलाव

अखेर मंगळवारी माटेगाव शिवारातील एका विहिरीमध्ये दोन मृतदेह तरंगताना आढळून आले. मात्र, याबाबत दोघांच्या नातेवाईकांनी पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार का दाखल केली नाही, याचा पोलिस शोध घेत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: September 1, 2020, 9:40 PM IST

ताज्या बातम्या