पुण्यात लव्ह ट्रॅंगल: सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रेयसीची केली निर्घृण हत्या

पुण्यात लव्ह ट्रॅंगल: सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रेयसीची केली निर्घृण हत्या

लव्ह ट्रँगल अर्थात प्रेमाच्या त्रिकोणातून प्रियकाराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

पुणे, 12 जून- चंदननगर भागात लव्ह ट्रँगल अर्थात प्रेमाच्या त्रिकोणातून प्रियकाराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 10 वाजता घडली. आरोपी प्रियकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मीना पटेल (वय-22, रा. चंदननगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिला जखमी अवस्थेत कोकडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्या तिचा प्राणज्योत मालवली. या प्रकरणी आरोपी किरण अशोक शिंदे (वय-25, रा.काळेवाडी) याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, आरोपी किरण शिंदे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.तो हिंजवडीतील एका कंपनीत नोकरी करतो. मीना आणि किरणचे प्रेमसंबंध होते. परंतु मीनाचे दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याचा किरणला संशय होता आणि या संशयातून त्याने मीनावर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली.

कोण होती मीना पटेल?

मीना ही मुळची गोंदिया येथील राहणारी होती. ती वल्लभनगरमध्ये एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होती. तीही काळेवाडीत राहत असल्याने तिची आरोपी किरण शिंदेशी ओळख झाली होती. मागील एक वर्षापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र,मागील काही दिवसांपासून मीना आणि किरणमध्ये वाद सुरु होते. मीनाचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु असल्याचा किरणला संशय होता. त्यामुळे दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. तेव्हापासून मीना किरणशी बोलत नव्हती. मीनाने काळेवाडीतील रुम सोडून ती चंदननगरात राहायला आली होती. त्यामुळे किरण अस्वस्थ होता.

किरण याने मंगळवारी मीनाला चंदननगरातील टाटा गार्ड रुमजवळ भेटायला बोलावले होते. तिथेही दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या किरण याने सोबत आणलेल्या चाकूने मीनावर वार केले. मीनाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून किरण याने तिथून पळ काढला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मध्य रेल्वेचं रडगाणं सुरूच, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: June 12, 2019, 12:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading