मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /प्रेमासाठी वाटेल ते, दिव्यांग तरुणी सांगलीहून एकटीच पोहोचली अमरावतीमध्ये

प्रेमासाठी वाटेल ते, दिव्यांग तरुणी सांगलीहून एकटीच पोहोचली अमरावतीमध्ये

अमरावतीच्या राहुल बावणे या युवकाची 6 वर्षांपूर्वी सांगली येथील आरती कांबळे या युवतीशी गोंदिया येथे अंधांच्या संमेलनात भेट झाली. आरतीने त्या संमेलनात गायलेल्या गाण्यामुळे राहुल आरतीवर फिदा झाला.

अमरावतीच्या राहुल बावणे या युवकाची 6 वर्षांपूर्वी सांगली येथील आरती कांबळे या युवतीशी गोंदिया येथे अंधांच्या संमेलनात भेट झाली. आरतीने त्या संमेलनात गायलेल्या गाण्यामुळे राहुल आरतीवर फिदा झाला.

अमरावतीच्या राहुल बावणे या युवकाची 6 वर्षांपूर्वी सांगली येथील आरती कांबळे या युवतीशी गोंदिया येथे अंधांच्या संमेलनात भेट झाली. आरतीने त्या संमेलनात गायलेल्या गाण्यामुळे राहुल आरतीवर फिदा झाला.

संजय शेंडे, प्रतिनिधी

अमरावती, 21 डिसेंबर : 'प्रेम (Love) म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं', या मंगेश पाडगावकर यांच्या कवितेतील ओळीप्रमाणे अमरावतीमध्ये दिव्यांग तरुण-तरुणीचा जात, धर्म, पंथ सगळी बंधने तोडून प्रेम विवाह (Love Marriage) पार पडला. अमरावती (Amravati) नजीकच्या माहुली (Mahuli) गावातील राहुल बावणे (Rahul Bavne) आणि सांगलीतील (Sangli) आरती कांबळे (Aarati Kamble) या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या तरुण जोडप्याची ही कहाणी (Love Story) आहे.

अमरावतीच्या राहुल बावणे या युवकाची 6 वर्षांपूर्वी सांगली येथील आरती कांबळे या युवतीशी गोंदिया येथे अंधांच्या संमेलनात भेट झाली. आरतीने त्या संमेलनात गायलेल्या गाण्यामुळे राहुल आरतीवर फिदा झाला. त्याने ते गाणे तब्बल 3 वर्षे अपल्या मोबाईल मध्ये संग्रहीत ठेवल्याचे राहुलने सांगितले. दोघेही त्यावेळी एकमेकांचे चांगले मित्र झाले. आरती ही सांगली जिल्ह्यातील मिरज येथील नांद्रे गावची तरुणी.

हेही वाचा : परीक्षांचे घोळाची CBI चौकशी व्हावी तरच खरे सूत्रधार बाहेर येतील - फडणवीस

आरती ही दोन्ही डोळ्यांनी अंध असली तरीही ती अतिशय उत्तम गायिका आहे. ऑर्केस्ट्रा व विविध कार्यक्रमांमध्ये गायन करुन ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते तर राहुल हा राज्यशास्त्र या विषयात पोस्ट ग्रॅज्युएट असून UPSC आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. आयबीपीएस बँकिंग परीक्षा त्याने उत्तीर्ण केलीय.

या दोघांच्या प्रेमाची माहिती आरतीच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी विरोध केला. आरतीला त्रास देणे सुरु केले. कुटुंबीयांच्या त्रासामुळे आत्महत्या करावी इथपर्यंत आरतीचा विचार झाला होता. मात्र राहुलने आपण लग्न करायला तयार असल्याचे सांगून तिला भावनिक आधार दिला. त्याक्षणी आरती सांगलीवरुन कुणालाही न सांगता थेट अमरावतीमध्ये पोहोचली.

हेही वाचा : 'वाह रे MVA तेरा खेल, सस्ती दारु, महंगा तेल', देवेंद्र फडणवीसांची चौफेर टीका

सुरुवातीला राहुलच्या कुटुंबातील मंडळीदेखील या विवाहाला तयार नव्हती. मात्र अखेर राहुल आणि आरतीच्या प्रेमापुढे राहुलच्या घरच्या मंडळींनी राहुलच्या विवाहाला संमती दिली. आज अखेर अमरावती नजीकच्या गावात राहुल आणि आरती यांचा साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. राहुलने पुढे युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. तसेच आपण आरतीला देखील पुढे आणखी शिक्षणासाठी मदत करणार असल्याचं सांगितलं.

"मियाँ बीबी राजी तो क्या करेंगा काझी", या उक्तीप्रमाणे आज अखेर हे दिव्यांग जोडपे विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नाची माहिती पोलीस ठाण्यात देखील राहुल आणि त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Amravati, Love story, Sangli