पुणे,27 जानेवारी: पुण्यात व्हॅलेंटाईन डे (valentine Day) अर्थात 14 फेब्रुवारीला अनोखी 'लव्ह परेड' (Love) निघणार आहे. विशेषत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी या लव्ह परेडमध्ये सहभागी होणार आहेत. व्हॅलेंटाईन डे जगभरात सेलिब्रेट केला जातो. त्यात पुणेकरही मागे नाहीत.
व्हॅलेंटाईन डेला गुलाबाच्या फुलांची मागणी वाढते. त्यामुळे गुलाब शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बरकत आली आहे. त्यामुळे प्रेमाचा प्रसार व्हावा यासाठी शहरात राहणारी शेतकरी मुले आणि इतर सर्वसामान्य नागरिक विशेषतः तरुण-तरुणी यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 14 फेब्रुवारीला फर्ग्युसन कॉलेज रोडची सुरुवात जिथं होते, त्या गुडलक चौकातून कृषी महाविद्यालय म्हणजे जिथं हा रस्ता संपतो या मार्गावर ही लव्ह परेड निघणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना सदस्य राहुल म्हस्के यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
कर्जमाफीवर राजू शेट्टी नाराज, म्हणाले...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी घोषणा केली आहे. कोणत्याही अटीशर्थीविना शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, सरकारच्या या घोषणेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे सातबारा कोरा झाल्याचे दिसत नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली.
दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. या कर्जमाफीमुळे प्रत्यक्षात नुकसान झालेल्याना लाभ नाही. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा नाही, असंही शेट्टी म्हणाले.
एकतर हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. म्हणजे नुकसानीची भरपाई मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. ज्या पिकांवर कर्ज घेतलं आहे. डाळिंब द्राक्षाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार नाही. शेतकऱ्यांना सरसकट फायदा झाला असे म्हणता येणार नाही, असंही शेट्टी म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.