'Love Chats' मुळे NRI तरुण फसला; महिलेने तब्बल 1 कोटी रुपयांना घातला गंडा

'Love Chats' मुळे NRI तरुण फसला; महिलेने तब्बल 1 कोटी रुपयांना घातला गंडा

एकाच आठवड्यात या महिलेविरोधात फसवणुकीच्या दोन तक्रारी समोर आल्या आहेत

  • Share this:

हैदराबाद, 2 जून : लग्नाच्या बहाण्याने अमेरिकेतील एका एनआरआयची तब्बल 65 लाखांची फसवणूक करणार्‍या 44 वर्षीय मालविका देवती या महिलेच्या विरोधात दुसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पहिल्या तक्रारीनंतर 27 मे रोजी या महिलेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर हैद्राबादमधील आयटी इंजिनिअप के.पी.एच.बी. पोलिसात या महिलेविरोधात तक्रार नोंदविली आहे. मालविकाने तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

व्हाट्सएप आणि टेलिग्रामवर मालाविकाने तिच्या “लव्ह चॅट्स” ने तरुणाला फसवले, असा दावा 33 वर्षीय इंजिनिअर तरुणाने केला आहे. तो म्हणाला की, स्वत:च्या बचतीसह त्याने महिलेला पैसे देण्यासाठी दुसऱ्यांकडून कर्जही काढले.

27 मे रोजी ज्युबिली हिल्स पोलिसांनी मालविका आणि तिचा मुलगा प्रणव ललित गोपाळ देवाथी (वय 22) यांना अमेरिकेतील एनआरआय अभियंत्याची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या महिलेने बनावट प्रोफाइल वापरुन लग्नाचे आमिष दाखवून इंजिनिअर तरुणाकडून कोटींमध्ये रुपये उकळल्याचा आरोप आहे. तिने जुबिली हिल्समधील डॉक्टरच्या नावाखाली तरुणाची फसवणूक केली.

लग्नाच्या बहाण्याने महिलेने एनआरआयची फसवणूक केली

मालविकाने त्याला सांगितले की, तिच्याकडे बरीच मालमत्ता आहे आणि मात्र तिची आई सर्व संपत्ती तिच्याकडे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत आहे. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर कायदेशीर लढा देण्यासाठी तिला पैशांची गरज आहे. त्या एनआरआयला मालविकाने केलेली थाप पटली. आणि त्यांनी 65 लाख रुपये पैसे ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तिच्याशी संपर्क होत नसल्याने आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी संतप्त हैदराबादमधील तरुणाने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्याने केलेल्या तक्रारीनुसार मालवीकाने अमेरिकेतील अनु पल्लवी या डॉक्टरच्या बनावट नावाचा प्रोफाइल वापरला आहे. तिच्या कुटुंबाचे राजकीय संबंध असल्याने तिला बँक खाते वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे तिने यावेळी सांगितल्याचे तरुणाने सांगितले. यापूर्वी देखील मालविकाने अशाच पद्धतीचा वापर करीत एनआरआयची अशीच फसवणूक केली होती.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये काय करायचं? बाप-लेकाने विहीर खोदून पाण्याची समस्या केली दूर

First published: June 2, 2020, 10:40 PM IST
Tags: fraud case

ताज्या बातम्या