मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

4 वर्षांपासून प्रेमसंबंध, तिने दिला नकार अन् प्रियकराने चिरला चाकूने गळा, नांदेडमधील घटना

4 वर्षांपासून प्रेमसंबंध, तिने दिला नकार अन् प्रियकराने चिरला चाकूने गळा, नांदेडमधील घटना

घरी आल्यावर सुरेशने तिला जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात...

नांदेड, 24 ऑक्टोबर : प्रेमभंग झाल्याने एका प्रियकराने (boyfriend ) प्रेयसीचा (girlfriend) चाकूने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड (nanded) शहरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या विकृत तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शारदानगर भागात ही घटना घडली.  वैष्णवी गौर ( व. 22) असं मयत तरुणीचं नाव आहे. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. घर चालवण्यासाठी ती एका खाजगी संस्थेत नोकरी करत होती. मागील 3 ते 4 वर्षांपासून आरोपी सुरेश शेंडगेसोबत तिचे प्रेमसंबंध होते.

Pune Job Alert: कृषी विभाग पुणे इथे 1,75,000 रुपये कमावण्याची संधी

आरोपी हा मोबाईल दुकानात कामाला होता. शारदा नगर येथील झेंडा चौक परिसरात भाड्याच्या खोलीत तरुणी आपल्या आई-वडिलांसोबात राहत होती. तिचे वडील एका खाजगी शाळेत सुरक्षा रक्षक आहेत. आई बांगड्याचे दुकान चालवते.काही दिवसांपासून वैष्णवी आणि सुरेशमध्ये दुरावा निर्माण झाला होता. यापुढे प्रेम संबंध ठेवण्यास तिने नकार दिला होता.

प्रेमभंग झाल्याने सुरेश हा नैराश्यात गेला होता. आज दुपारी तो वैष्णवीच्या घरी गेला. यावेळी ती एकटीच घरात होती. घरी आल्यावर सुरेशने तिला जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात सुरेशने चाकू काढून तिचा गळा चिरला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO

घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. आरोपीला याच परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

First published:

Tags: Nanded