अज्ञात माथेफिरुने कांदा चाळीत टाकला 'युरिया', 120 क्विंटल कांद्याची नासाडी

अज्ञात माथेफिरुने कांदा चाळीत टाकला 'युरिया', 120 क्विंटल कांद्याची नासाडी

अज्ञात माथेफिरुने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यात युरिया टाकल्यामुळे तब्बल 120 क्विंटल कांदा खराब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

बब्बू शेख,(प्रतिनिधी)

मनमाड,23 सप्टेंबर: अज्ञात माथेफिरुने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यात युरिया टाकल्यामुळे तब्बल 120 क्विंटल कांदा खराब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवळा तालुक्यातील भाऊर येथे ही घटना घडली असून संबंधित शेतकऱ्याचे सुमारे 5 लाख रुपयांचे झाले आहे.

2 महिन्यांपूर्वी कांद्याला मातीमोल भाव मिळत होता त्यामुळे पुढे भाव वाढतील या आशेवर विष्णू आहेर या शेतकऱ्याने चाळीत कांदा साठवून ठेवला होता. सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असताना अज्ञात माथेफिरुने चाळीत युरिया टाकल्यामुळे सुमारे 120 क्विंटल कांदा खराब झाला. आहेर यांचे सुमारे 5 लाख रुपयांचे झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. युरिया टाकणाऱ्याचा शोध घेण्याची मागणी केली जात आहे.

कांदा भावात रात्रीतून भाववाढ..

कांद्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याने भावात रात्रीतून कांदा 5 हजारी झाला आहे. भाव अजून वाढणार असल्याचे केंद्रीय समितीचा अहवालात म्हटले आहे. यामुळे नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कांदा दरात चक्क एका रात्रीतून साडेबाराशे रुपयांची वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मोठी मागणी वाढल्याने शेतकरी आनंदात आहे. केंद्रीय समितीने पाहणी करून दर अधिक वाढतील, असा अहवाल सादर केला आहे. पावसामुळे कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेशात कांदा पिकाला बसलेल्या मोठ्या फटक्याचा लाभ हा नाशिकच्या शेतकऱ्यांना झाला. दुसरीकडे, कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून स्टॉक लिमिटच्या पर्यायाचा विचार केला जात आहे. कांदा आयात, एमईपी वाढवल्यानंतरही कांद्याच्या दरात उच्चांक कायम आहे.

देशातल्या प्रमुख महानगरांमध्ये कांद्याने 70 पार केली आहे. दरम्यान, निवडणुका आणि सणांच्या तोंडावर कांद्याचे भाव नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरु आहे. व्यापाऱ्यांकडे किती कांदा (स्टॉक) असावा याचे नियंत्रण सरकार करण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत ट्रान्सफॉर्मरमध्ये आग; स्फोटाची भीषणता दाखवणारा CCTV VIDEO

First published: September 23, 2019, 2:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading