बीड, 27 जानेवारी : बीड जिल्ह्यातील माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Majalgaon market committee) शेतकऱ्यांच्या शेतमालावर दिवसाढवळ्या व्यापार्यांकडून डल्ला मारून लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेकडो शेतकऱ्यांची होणारी लूट थांबावी यासाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackery) यांना साकडं घातले आहे.
शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक,जिल्हाधिकारी यांना तक्रार केली असून व्यापाऱ्याकडून हमीभावापेक्षा कमी दराने तूर खरेदी केली जात असून शेतकऱ्याची सर्रास लूट केली जात असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि कर्मचारी व्यापाऱ्यांना पाठीशी घालून संगनमताने शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शिवसेनेच्या कार्यक्रमाला भाजपची गर्दी ; तर BJPच्या कार्यक्रमाला सेना खासदार
धारुर तालुक्यातील हिंगणी गावच्या प्रकाश सोळंके यांनी माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 11 क्विंटल तूर विक्रीसाठी आणली होती विक्रीला आडत दुकानदार विष्णू मुंदडा या खाजगी व्यापाऱ्यांने हमीभावापेक्षा कमी दराने म्हणजेच 5 हजार रुपये क्विंटल दराने खरेदी केली. तसेच पक्की पावती देण्यास नकार दिला. पक्की पावती द्या, अशी मागणी केल्यानंतर व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केली, याचा व्हिडिओ देखील आहे. याविरोधात प्रकाश सोळंके यांनी बाजार समितीच्या व्यवस्थापकीय मंडळ सभापती सचिव यांच्याकडे तक्रार केली.
मात्र, त्यांनीदेखील व्यापाऱ्यांची पाठराखण केली त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली असून यासंदर्भात अद्याप कारवाई झाली नाही शेतकऱ्याची दिवसाढवळ्या होणारी लूट थांबवावी अशी मागणी शेतकरी प्रकाश सोळंके यांनी केले आहे.
कोरोनानं नोकरी हिरावली, सुरू केला बिझनेस, आता महिन्याला लाखभर कमावतो
हिंगणी गावातील उद्धव शिंदे यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला काबाडकष्ट करून घाम गाळून पिकवलेले शेतातील 19 क्विंटल तूर मार्केट कमिटी मध्ये विक्रीसाठी घेऊन आल्यानंतर यांचीदेखील फसवणूक करण्यात आली. हमीभाव 6000 असताना व्यापाऱ्यांनी शक्ती 4800 रुपयांनी खरेदी करतात. या शेतकऱ्यांची लूट केली याविरोधात शेतकऱ्याने विचारणा केली असता या व्यापाऱ्यांनी अरेरावीची भाषा करत यांना देखील दुकानातून काढून दिले याविरोधात उद्धव शिंदे यांनी देखील तक्रार केली. मात्र, अद्यापपर्यंत यावर मार्केट कमिटीच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी व सभापती ने लक्ष दिले नाही असे उद्धव शिंदे यांनी म्हटले आहे.
'मै टकलू हो जाऊंगा' चिमुकल्याचा केस कापतानाचा क्यूट व्हिडीओ पुन्हा VIRAL
जिल्ह्यात यावर्षी तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून पीक देखील जोमदार आली आहे. मात्र, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची केली जाणारी दिवसाढवळ्या लूट यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट निर्माण झाले असून शासकीय खरेदी केंद्र कमी असल्याने तूर विक्री करावी कुठे शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे. याबाबतीत लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.