मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Long Weekend चा होऊ शकतो विचका, महाबळेश्वरला या गोष्टीमुळे पर्यटकांना मोठा फटका

Long Weekend चा होऊ शकतो विचका, महाबळेश्वरला या गोष्टीमुळे पर्यटकांना मोठा फटका

सलग सुट्ट्या आल्यामुळे बऱ्याच ऑफिसला सुट्ट्या आहेत. कॉलेज शाळांनाही सुट्टा असल्याने बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

    सातारा: सलग सुट्ट्या आल्यामुळे बऱ्याच ऑफिसला सुट्ट्या आहेत. कॉलेज शाळांनाही सुट्टा असल्याने बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पावसामुळे निसर्गरम्य वातावरणात जाण्याची इच्छा होते, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा समोर येतं ते म्हणजे महाबळेश्वर. महाबळेश्वरला फिरायला जायचा प्लॅन करत असाल त तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सलग सुट्ट्या डोक्यात ठेवून महाबळेश्वरला जाणार असाल तर तुम्हाला प्लॅन रद्द करावा लागू शकतो. कारण महाबळेश्वरमध्ये सध्या पर्यटक मोठ्या संकटात सापडले आहेत. तिथे मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याने पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. साताऱ्यातील हिलस्टेशन म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे वीजेची समस्या तिथे भेडसावत आहे. याचा फटका तिथे पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनाही बसत आहे. मंगळवारी महाबळेश्वरमध्ये 237 mm, बुधवारी 217 mm, गुरुवारी 174 mm पावसाची नोंद करण्यात आली. मुसळधार पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. महावितरणकडून हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वीज पुरवठा खंडित होत असल्याने तिथे स्थानिक बाजारपेठेत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा फटका पर्यटकांनाही बसला आहे. अति मुसळधार पाऊस आणि वादळामुळे महाबळेश्वर भागातील काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. तो पूर्ववत करण्यात काही अडचणी देखील येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर व्यवसाय आणि पर्यटनाला याचा मोठा फटका बसल्याची माहिती स्थानिक हॉटेल, रिसॉर्ट आणि लघु उद्योग करणाऱ्यांनी दिली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या