Home /News /maharashtra /

शॉर्ट कट मारण्याच्या नादात खोल दरीत अडकला तरूण, 'शिवदुर्ग'ने दिले जीवदान

शॉर्ट कट मारण्याच्या नादात खोल दरीत अडकला तरूण, 'शिवदुर्ग'ने दिले जीवदान

अतिउत्साही पणामुळे केलेला स्टंट हा जीवावर बेतणार हे लक्षात आल्यावर यशने मदतीसाठी आरडा ओरड सुरू केली.

  अनिस शेख, लोणावळा, 22 जानेवारी : विसापूर किल्ल्यावर आपल्या सात मित्रांसोबत पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटक तरुणाला अतिउत्साही पणामुळे आपला जीव गमवावा लागला असता. परंतु शिवदुर्ग रेस्क्यू टीमची वेळीच मदत मिळाल्याने 20 वर्षीय तरुणाला जीवदान मिळाले आहे. यश कासाट असे पर्यटकाचे नाव आहे. विसापूर किल्ल्यावर आपल्या 7 मित्रांसोबत फिरत असताना धोकादायक कड्यावरून शॉर्टकटने खाली उतरण्याच्या नादात यश अशा ठिकाणी जाऊन अडकला, जिथून त्याला वर तसेच खाली जाता येत नव्हते. अतिउत्साही पणामुळे केलेला स्टंट हा जीवावर बेतणार हे लक्षात आल्यावर यशने मदतीसाठी आरडा ओरड सुरू केली. त्याच्यासोबत आलेल्या इतर मित्रांनी पाटस गावातील ग्रामस्थांच्या मदतीने कड्यावरून यशला सुखरूप बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु ते निष्फळ ठरले. शेवटी 'शिवदुर्ग' रेस्क्यू टीमला विसापूर किल्ल्यावर बचावकार्यासाठी बोलवण्यात आले. क्षणाचाही विलंब न करता रोहीत वर्तक, योगेश उंबरे हे हार्निस बांधून सर्व साहित्य सोबत घेत कड्यावरून मार्ग काढत खाली उतरले. तसंच अडकून पडलेल्या यश याच्यापर्यंत पोहोचले. त्याला दोरीमध्ये हर्निसने लॉक करुन सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. तीन तासांपेक्षा अधिक काळ अडकून पडलेल्या यश कासटला परिश्रमाची परीकाष्ठा करत शिवदुर्ग रेस्क्यू टीमने जीवदान दिल्याने पाटस गावातील ग्रामस्थांनीही शिवदुर्गच्या 'देवदूतां'चे आभार मानले.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Fort, Lonavala

  पुढील बातम्या