उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत नवा ट्विस्ट

उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत नवा ट्विस्ट

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून राष्ट्रवादीत घोळ कायम असल्याचं चित्र आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 21 मार्च : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून राष्ट्रवादीत घोळ कायम असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी माजी खासदार पद्मसिंह पाटील यांची सून अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत आहे. पण आता पद्मसिंह पाटील यांच्या नावाने उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

पद्मसिंह पाटील यांच्या नावाने उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आल्याने ते पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात उतरणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. तेर इथल्या सोमनाथ मुळे यांनी पद्मसिंह पाटील यांच्या नावाने 4 अर्ज खरेदी केले आहेत.

या सर्व घडामोडींमुळे उस्मानाबादमधून राष्ट्रवादीकडून नक्की कुणाला संधी जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाला आहे.

दुसरीकडे, पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येईल, अशीही चर्चा रंगली होती. पण त्यांना पक्षातून विरोध झाल्याने अरविंद शिंदे यांचं नाव पुढे आलं आहे.

पुण्यातून उमेदवारीसाठी अरविंद शिंदे यांचं नाव चर्चेत आल्याने इतर इच्छुक नेते नाराज झाले आहेत. अभय छाजेड, मोहन जोशी, अनंत गाडगीळ हे काँग्रेस नेतेही पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण अरविंद शिंदे यांच्या उमेदवारीवर पक्षाकडून विचार केला जात असल्याने या इच्छुक नेत्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात इच्छुक नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे उमेदवारीवरून पुणे काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे.

पुण्यातील स्थानिक इच्छुकांची यादी मोठी असतानाच यात बाहेरील व्यक्तींची नावे पुढे कशी काय येतात? असा सूर पुण्यातील काँग्रेस नेत्यांमधून उमटला आहे. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत स्थानिक नेत्यांनी प्रवीण गायकवाड आणि संजय काकडे यांच्या उमेदवारीच्या चर्चेवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

SPECIAL REPORT: सांगली कुणासाठी चांगली?

First published: March 21, 2019, 12:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading