'PM मोदींची छाती 56 असेल तर कुलभूषण यांना का सोडवले नाही'

'PM मोदींची छाती 56 असेल तर कुलभूषण यांना का सोडवले नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाती खरंच जर 56 इंचाची असेल तर ते कुलभूषण जाधव यांना सोडवून का आणत नाहीत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

  • Share this:

कराड, 25 मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाती खरंच जर 56 इंचाची असेल तर ते कुलभूषण जाधव यांना सोडवून का आणत नाहीत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. कराड येथील महाआघाडीच्या प्रचारसभेत पवारांनी मोदी आणि भाजपवर हल्ला चढवला. पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईक बद्दल सर्वांनाच अभिमान आहे. पण जवानांच्या पराक्रमाचा फायदा घेणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असा इशारा पवारांनी दिला.

राफेलवरुन देखील टीका

मोदी सरकारने राफेल विमानाच्या किंमती वाढवून गैरव्यवहार केला. ज्या कंपनीने कागदाचे विमान तयार केले नाही अशा कंपनीला त्याचा ठेका दिला. आता तर मोदी सरकार राफेलचा हिशोब द्यायला घाबरते असा आरोप त्यांनी केला. बोफोर्स तोफा खरेदीच्या चौकशीला तर राजवी गांधी घाबरले नव्हते तर मग मोदी राफेलच्या चौकशीला का घाबरते, असा सवाल पवारांनी केला.

मोदी पंतप्रधान होणार नाहीत...

काही दिवसांपूर्वी पवारांनी निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असे वक्तव्य केले होते. कराड येथील सभेत त्यांनी पुन्हा एकदा सांगितले की, 2019च्या निवडणुकीच्या निकालानंतर मोदी पंतप्रधान असणार नाहीत. हे मी भविष्यवेत्ता म्हणू्न नव्हे तर राजकीय विश्लेषक म्हणून सांगतोय, असे पवारांनी सांगितले.

काय म्हणाले पवार

-मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावले

-ना खाऊंगा ना खाने दुंगा हे मोदींचे आश्वासन फसवे

-नोटबंदीतून काळा पैसा बाहेर काढण्याचे आश्वासन शंभर टक्के खोटे ठरवले

-मोदी व भाजपने जवानांच्या शौर्याचे राजकारण केले

-गेल्या दोन वर्षांत केवळ महाराष्ट्रात १२ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली

-नरेंद्र मोदींसारखा हुकूमशहा सत्तेत राहिल्यास या देशाचे संविधान व लोकशाहीही राहणार नाही

VIDEO: प्रचारासाठी अमोल कोल्हे घोड्यावर स्वार, चाहत्यांनी सेल्फीसाठी गेली गर्दी

Tags:
First Published: Mar 25, 2019 07:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading