• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'पवार हे अष्टपैलू नेते, ज्योतिषी कधीपासून झाले?'
  • VIDEO: 'पवार हे अष्टपैलू नेते, ज्योतिषी कधीपासून झाले?'

    News18 Lokmat | Published On: Mar 13, 2019 03:44 PM IST | Updated On: Mar 13, 2019 04:19 PM IST

    मुंबई, 13 मार्च : सुजय विखे पाटील यांच्या भेटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. ''पवार हे अष्टपैलू नेते आहेत, ज्योतिषी म्हणून कधी त्यांची ओळख झाली नाही,'' असं ते म्हणाले. तर आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना ''शिवसेना प्रमुखांनी निवडणूक लढविण्यासंदर्भात माझ्यावर कधीच कोणतं बंधन टाकलं नव्हतं. मीदेखील आदित्यवर कोणतंही बंधन टाकलेलं नाही. निवडणूक लढवायची, की नाही? हा सर्वस्वी त्याचा निर्णय राहील,'' असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर भाजप-सेना युती झाल्यानंतर रणनितीचा आराखडा तयार झाला असून,आता त्यात कुणीही मिठाचा खडा टाकू शकत नाही,'' असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading