उद्धव ठाकरेंच्या या आश्वासनानंतर श्रीनिवास वनगांची माघार

उद्धव ठाकरेंच्या या आश्वासनानंतर श्रीनिवास वनगांची माघार

उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगांना विधानसभा निवडणुकीत तिकीटाचं आश्वासन दिलं आहे.

  • Share this:

मुंबई 26 मार्च : पालघरचा उमेदवार कोण असावा याचा निर्णय अखेर झालाय. पोटनिवडणुकीत जिंकलेली ही जागा भाजपने विजयी उमेदवारासह शिवसेनाला देऊन टाकली. शिवसेनेने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. मात्र निवडून येण्याचा निकष ठेवल्याने शेवटी भाजपचा उमेदवारच भाजपने शिवसेनेला दिला. आणि उद्धव ठाकरेनी श्रीनिवास वनगांना विधानसभेचे आश्वासन दिलं.

चिंतामण वनगांच्या निधनानंतर भाजपने त्यांचा मुलगा श्रीनिवास वनगांना उमेदवारी न देता शिवसेनेला अंगावर घेत विजय गावितांना तिकीट दिलं आणि निवडणुनही आणलं. मात्र युती झाल्यानंतर सर्वच गणितं बदलली आहेत. पोटनिवडणुकीत श्रीनिवास यांना सेनेनं आश्वासन दिलं होतं.

मात्र उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगांना विधानसभा निवडणुकीत तिकीटाचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगांनी माघार घेतलीय. थेट लोकसभेवर जाण्यापेक्षा आधी विधानसभेत जाऊन काम करावं आणि नंतर लोकसभेत जाण्याचा विचार असल्याचं श्रीनिवास वनगांनी स्पष्ट केलं.

सर्वच पक्षांचा अनुभव

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीपासून या उमेदवाराने 3 वेळा पक्ष बदलला. अगदी ऐन वेळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरण्याचा त्यांचा इतिहास आहे. पण याच उमेदवारामुळे इतके दिवस अडलेला युतीचा पालघर पेच सोडवला आहे. हा उमेदवार आहे राजेंद्र गावित.

2014 ते 2019 दरम्यान गावित यांनी काँग्रेस ते शिवसेना व्हाया भाजप असा प्रवास करत लोकसभेचं तिकीट मिळवलं. काँग्रेस, भाजप अशा वाटेने अखेर गावित शिवसेनेत प्रवेश करते झाले आणि लगेचच त्यांच्या उमेदवारीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. सर्व पक्षांना हवेसे वाटणारे राजेंद्र गावित नेमके आहेत कोण आणि त्यांच्यासाठी पायघड्या घालायला सगळे कसे उत्सुक आहेत?

असा आहे पालघरचा इतिहास

पालघर लोकसभा मतदारसंघाचा बराचसा भाग आदिवासीबहुल आहे. या भागात कुठल्याही पक्षाकडे हमखास जिंकणारा उमेदवार कधीच नव्हता. चिंतामण वनगा यांचं इथे वर्चस्व होतं. ते भाजपचे सदस्य होते. 2014च्या निवडणुकीत पालघर मतदारसंघ भाजपने जिंकला. वनगा खासदार झाले. त्यांच्याविरोधात उभे होते हेच राजेंद्र गावित, जे त्या वेळी काँग्रेसचे उमेदवार होते. पण 2018च्या सुरुवातीला चिंतामण वनगा यांचं अचानक हृदयविकाराने निधन झालं आणि पालघरसाठी पोटनिवडणूक घ्यायची वेळ आली.

गेल्या वर्षी मेमध्ये झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी सेना-भाजप यांचे संबंध ताणलेले होते. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढण्याच्या पवित्र्यात असतानाच चिंतामण वनगांचा मुलाला सेनेनं तिकिट देऊ केलं. अशा प्रकारे श्रीनिवास वनगा भाजपऐवजी शिवसेनेत दाखल झाले आणि भाजपची आयत्या वेळी उमेदवारासाठी शोधाशोध सुरू झाली. पालघर भागात वनगांनंतर चर्चा होती राजेंद्र गावित या नावाची. काँग्रेसमधून त्यांना फोडण्यात भाजप यशस्वी झाला आणि त्यांचा उमेदवाराचा शोध संपला. राजेंद्र गावित यांनी पोटनिवडणूक झाल्यानंतर अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तास आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

वनगा विरुद्ध गावित असाच हा सामना झाला आणि तो गावितांनी जिंकला. शिवसेनेकडून लढणारे श्रीनिवास वनगा यांचा या पोटनिवडणुकीत पराभव झाला. तो केला या राजेंद्र गावित यांनी. पण गावित त्या वेळी भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. काँग्रेस पक्ष तेव्हा चौथ्या स्थानावर फेकला गेला होता. राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगा यांच्या मतांमध्ये फार मोठी तफावत नव्हती.

First published: March 26, 2019, 9:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading