Home /News /maharashtra /

सांगलीवरून आघाडीत वाद, तिढा सोडवण्यासाठी पाटील-शेट्टींमध्ये मॅरेथॉन बैठक

सांगलीवरून आघाडीत वाद, तिढा सोडवण्यासाठी पाटील-शेट्टींमध्ये मॅरेथॉन बैठक

काँग्रेस आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि स्वाभीमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये एक मोठी बैठक झाली.

    सांगली, 26 मार्च : सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून निर्माण झालेला आघाडीतील पेच सोडवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि स्वाभीमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये एक मोठी बैठक झाली. सांगलीच्या जागेबाबत दोन दिवसात सकारात्मक निर्णय होईल अशी आशा या बैठकीनंतर नेत्यांनी व्यक्ती केली आहे. येत्या दोन दिवसात आघाडीबाबत कोणतीही वेगळी भूमिका घेऊ नये अशी विनंतीही आमदार बंटी पाटील यांनी राजू शेट्टींना केली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लागलेलं बंडखोरीचं ग्रहण काही सुटता सुटेना. काँग्रेसला सोडचीठ्ठी देण्याची घोषणा प्रतिक पाटील यांनी रविवारी केली होती. त्यानंतर आता त्यांचे बंधू विशाल पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा प्रतिक पाटील यांनी केलीय. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहे. राजू शेट्टी यांनी आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर सांगली स्वाभिमानीला मिळावी अशी मागणी शेट्टी यांनी केली होती. त्यामुळे ही जागा त्यांच्यासाठी सोडण्याचा काँग्रेसचा विचार आहे. या जागेवरचा हक्क गेल्याने नाराज झालेल्या प्रतिक पाटील यांनी सरळ काँग्रेसलाच सोडचिठ्ठी दिली देण्याची घोषणा केली. 'विशाल हा काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज दाखल करेल, पक्षाने त्यांची उमेदवारी अंतिम करायची की नाही हे ठरवावे,' असं प्रतिक पाटील यांनी म्हटलं आहे. सांगलीत वसंतदादा घराण्याची ताकद असताना ही जागा दुसरीकडे का गेली असा सवालही त्यांनी केला. भाजप प्रवेशावर काय म्हणाले प्रतिक पाटील? वसंतदादा घराणे हे काँग्रेस मधेच राहणार आहे. त्यांचे सदस्य भाजपमध्ये कधीच जाणार नाहीत असं स्पष्टीकरण प्रतिक पाटील यांनी दिलंय. पाटील यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. VIDEO मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर होती - सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
    First published:

    Tags: Raju shetty, Sangali

    पुढील बातम्या