Loksabha election 2019 निवडणुकीच्या आजच्या सर्व बातम्या फक्त 'एका क्लिक'वर

Loksabha election 2019 निवडणुकीच्या आजच्या सर्व बातम्या फक्त 'एका क्लिक'वर

निवडणूक आणि राजकारणाच्या सर्व घडमोडी, खास रिपोर्ट्स फक्त 'एका क्लिकवर'

  • Share this:

VIDEO : प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून बेदम मारहाण

बीड, 27 मार्च : भाजपच्या बीडमधील उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत तक्रार नोंदवली म्हणून मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार करणाऱ्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. जिल्हाधिकारी कार्यालयातच ही मारहाण झाली. सुमारे 150 भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला, असा दादासाहेब मुंडे या तक्रारदाराचा आरोप आहे. फेसबुकवरून त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. प्रीतम यांच्याकडे 2 पॅनकार्ड आहेत. 'प्रीतम गोपीनाथ मुंडे' नावाने बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदान यादीत नाव आहे. तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याची टीका काही कार्यकर्त्यांनी केली होती.

बीड: प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विरोधकांनी गेले गंभीर आरोप

बीड, 27 मार्च : भाजपच्या बीड लोकसभा उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा निवडणुकीसाठी वापर केल्याचा आरोप बीडमधील अपक्ष उमेदवार कालिदास अपटे यांनी केला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वापर करत मतदारांना भावनिक करून राजकीय फायदा करत असल्याची टीकाही करण्यात आली आहे.

उमेदवारी न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज, काँग्रेस कार्यालयातील 300 खुर्च्या नेल्या

औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली नाही म्हणून नेते नाराज झाल्याच्या आणि पक्ष सोडल्याच्या अनेक बातम्या तुम्ही रोज वाचत असालच. पण यात एक अजब प्रकार समोर आला आहे. लोकसभेची उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेस पक्षातील एका नेत्याने थेट ऑफिसमधल्या खुर्च्य़ा घेऊन गेले.

SPECIAL REPORT: बीडच्या रणांगणात बहिण भावाच्या अस्तित्वाची लढाई

बीड :बीडच्या लोकसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई होत आहे. दोघांनीही मोठं शक्तीप्रदर्शन करत एकमेकांना थेट आव्हान देत रणशिंग फुंकलं आहे. बीड लोकसभेच्या रणांगणात दोघांच्याही अस्तित्वाची लढाई असल्यामुळे, 'मुंडे विरुद्ध मुंडे' हा संघर्ष किती टोकाला जाणार याची झलक दोघाही बहिण भावानं पहिल्याच दिवशी दाखवून दिली.

SPECIAL REPORT: पवारांचं 'चक्रव्युह' विखेंचा 'सुजय' भेदू शकेल?

नगर : सुजय विखे यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार काल स्वतः नगरमध्ये ठाण मांडून बसले होते. काल त्यांनी फक्त विखे विरोधकांनाच एकत्र केलं नाही तर व्यापाऱ्यांचीही आढावा बैठक घेतली. त्यामुळे पवारांचं हे चक्रव्युह विखेंचा सुजय नेमका कसा भेदतो हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे.

दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ! ईशान्य मुंबईतून पियूष गोयल रिंगणात?

भाजपच्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. मुंबईतील अन्य मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणाऱ्या भाजपनं किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीसंदर्भात सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यातच किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा जोरदार विरोध आहे. यामुळेच ईशान्य मुंबई मतदार संघातील उमेदवारी जाहीर करण्यास उशीर होत असल्याचं म्हटलं जात आहे. यातच प्रवीण छेडा यांनी गेल्याच आठवड्यात भाजपप्रवेश केल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे.

VIDEO: उद्धव ठाकरेंनी एकवीरा देवीकडे काय मागितलं?

कार्ला : लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या कुळाचाराप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सहकुटुंब कार्ला येथील एकवीरा देवीचं दर्शन घेतलं. एकवीरा देवी ठाकरे कुटुंबीयांची कुलदैवत आहे. मोठ्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक निकालांनंतरही ठाकरे कुटुंब विजयी उमेदवारांना घेऊन कुलदैवत एकवीरा देवीचा आशिर्वाद घेण्यासाठी दर्शनाला येतात. बुधवारी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार दर्शनासाठी आले होते.

पुण्याच्या उमेदवारीवरुन काँग्रेसचा घोळ संपेना, दिल्लीत होणार घोषणा

पुणे : पुण्याचा उमेदवार निवडण्यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेला घोळ संपता संपेना. यासाठी सुरू असलेला शोध आज संपण्याची शक्यता आहे. प्रदेश काँग्रेसने काही नावांची यादी दिल्लीत पाठवली असून आज घोषणा होण्याची शक्यता आहे.

VIDEO: 'मी सुद्धा बारामतीची लेक आणि दौंडची सून'

बारामती : बारामती लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार कांचन कूल यांची बारामती येथे मंगळवारी जाहीर सभा झाली. त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात 'मोदींसारख्या महागुरूंच्या या शाळेत माझ्यासारखा विद्यार्थी कच्चा राहूच शकत नाही' असं त्या म्हणाल्या. ''मी सुद्धा बारामतीचीच लेक आणि दौडची सून असून, मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करून दाखवेन'' असं त्या म्हणाल्या.

SPECIAL REPORT: दोन सिंह भाजपच्या जाळ्यात, तरीही सस्पेन्स कायम

पवारांनी संजयमामा शिंदे यांना पुन्हा राष्ट्रवादीकडे खेचून माढ्याचा तिढा सोडवला असला तरी, भाजपला मात्र उमेदवारीचा तिढा अद्याप सोडवता आलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी अकलूज आणि फलटण अशा दोन्ही ठिकाणच्या रणजितसिंहांना जाळ्यात ओढलं खरं. पण त्यांची नजर अजूनही अकलूजच्या मोठ्या सिंहावर अर्थात विजयदादांवरच खिळलेली आहे.

101 कोटींच्या मालकीण आहेत हेमा मालिनी, 5 वर्षात 34 कोटींनी वाढली संपत्ती!

नवी दिल्ली: भापने उत्तर प्रदेशच्या मथूरामधून प्रसिद्ध अभिनित्री हेमा मालिनी यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. हेमा मालिनी या मथुरमधूनच खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी बुधवारी हेमा मालिनी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्जामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 101 कोटी संपत्ती असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे.

पंतप्रधान मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा, राहुल गांधी यांचं खोचक ट्विट

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या ट्विटरवर जास्तच सक्रिय आहेत. 'मिशन शक्ती' यशस्वी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी DRDO चं अभिनंदन केलं. तुमच्या कामाचा आम्हाला अभिमान आहे असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खोचकपणे शुभेच्छाही दिल्या.

उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राहुल गांधींनी केले स्वागत!

नवी दिल्ली: प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी संजय निरुपम देखील उपस्थित होते.

VIDEO: 'आता मुख्यमंत्र्यांना कशी काय चालते घराणेशाही?', रोहित पवार यांची टीका

बारामती : मुख्यमंत्र्याच्या भाषणावर टाळ्या पिटणाऱ्या विखे आणि मोहिते पाटलांना त्यांच्या वडीलांनी आणि आजोबांनी केलेल्या कामाचा विसर पडलाय असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विखे आणि मोहितेचं घराणं कसं काय चालतं असा प्रश्नही त्यांनी विचारलाय.

VIDEO: 'मराठी मुलगी आहे, पाहिजे तेव्हा मला तलवार काढता येते'

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या दौंड तालुक्यात बोलत होत्या. ''कोणी खोटे आरोप केले तर मी अजिबात ऐकून घेणार नाही. मराठी मुलगी आहे, पाहिजे तेव्हा मला तलवार काढता येते,'' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ''आपण बॅकफूटला खेळतो. बॅक फुटला खेळायची आपल्याला कसली चोरी?'' असं म्हणत बिंदास सिक्सरवर सिक्सर मारायचा सल्ला त्यांनी महिलांना दिला.

पार्थ पवार यांचा लोकलने सीएसएमटी ते पनवेल असा प्रवास, पाहा फोटो

पार्थ पवार यांनी लोकलचा प्रवास करुन सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

First published: March 27, 2019, 6:53 PM IST

ताज्या बातम्या