Opinion Poll 2019 : 2014ची पुनरावृत्ती? मुंबईत युती मारणार सिक्सर

Opinion Poll 2019 : 2014ची पुनरावृत्ती? मुंबईत युती मारणार सिक्सर

लोकसभा निवडणूक 2019मध्ये मुंबईच्या सहाच्या सहा जागांवर शिवसेना-भाजपचेच उमेदवार विजय होणार, असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : देशभरात सध्या लोकसभा निवडणूक 2019चे जोरदार वारे वाहत आहेत. सत्ता काबीज करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष कंबर कसून प्रचाराच्या मैदानात उतरला आहे. भाजपला सत्तेतून बाहेर खेचून काढण्यासाठी विरोधकही तोडीस तोड रणनीती आखत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक एजन्सीचे सर्व्हे, ओपिनियन पोल जाहीर होत आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीच्या ओपिनियन पोलमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीला 48 टक्के मतं मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर  2014 च्या निवडणुकीत ही टक्केवारी 49 टक्के एवढी होती. महाराष्ट्रात एनडीएचा दबदबा कायम राहील, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत युतीचीच हवा

महत्त्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीत मुंबईवर युतीचीच हवा कायम राहणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार, मुंबईच्या निकालांमध्ये  लोकसभा निवडणूक 2014चीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईच्या सहाच्या सहा जागांवर युतीचे उमेदवार जिंकतील, तसंच आघाडीला यावर्षीही भोपळा फोडता येणार नाही, असा अंदाज ओपिनिय पोलमध्ये वर्तवला गेला आहे.

लोकसभा निवडणूक 2019       टक्केवारी     (अंदाज)

एनडीए                                         48 टक्के

आघाडी                                         37 टक्के

अन्य                                              13 टक्के

वंचित बहुजन आघाडी                   02 टक्के

लोकसभा निवडणूक 2014     टक्केवारी

एनडीए                                        49.6 टक्के

आघाडी                                       36.9 टक्के

अन्य                                             13.5 टक्के

लोकसभा निवडणूक 2019 : मुंबईची लढाई

उत्तर मुंबई  मतदारसंघ  :  गोपाल शेट्टी (भाजप) विरुद्ध उर्मिला मातोंडकर (कॉंग्रेस) (संभाव्य)

उत्तर पश्चिम मतदारसंघ  : गजानन कीर्तीकर विरुद्ध संजय निरुपम (कॉंग्रेस)

उत्तर पूर्व मतदारसंघ      : किरीट सोमैया (भाजप) (संभाव्य) विरुद्ध संजय पाटील (राष्ट्रवादी)

उत्तर मध्य मतदारसंघ    : पूनम महाजन (भाजप) विरुद्ध प्रिया दत्त (कॉंग्रेस)

दक्षिण मध्य मतदारसंघ  : राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस)

दक्षिण मुंबई मतदारसंघ : अरविंद सावंत (शिवसेना) विरुद्ध मिलिंद देवरा (कॉंग्रेस)

मुंबईतील या सहाच्या सहा जागांवर युतीचेच उमेदवार जिंकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वाचा अन्य बातम्या

Survey लोकसभा 2019: आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येईल?; भाजप की काँग्रेस...

VIDEO : पहिल्या भाषणानंतर ट्रोल झालेले पार्थ पवार आता झाले आक्रमक; बारणे-पवार असं रंगलं शाब्दिक युद्ध

पुण्याचा घोळ संपणार, या नेत्याला मिळणार काँग्रेसचं तिकीट?

VIDEO : पहिल्या भाषणानंतर ट्रोल झालेले पार्थ पवार आता झाले आक्रमक; बारणे-पवार असं रंगलं शाब्दिक युद्ध

First published: March 27, 2019, 8:21 PM IST

ताज्या बातम्या