गुप्त माहिती नीट ठेवता येत नाही, मोदी देशाचं रक्षण काय करणार - पवार

गुप्त माहिती नीट ठेवता येत नाही, मोदी देशाचं रक्षण काय करणार - पवार

अभिनंदनला सोडले तर कुलभूषणला का नाही सोडले, 56 इंचाची छाती गेली कुठं गेली?

  • Share this:

विशालम माने, परभणी, 26 मार्च : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांना देशाची गुप्त माहिती नीट ठेवता येत नाही, ते देशाचं काय रक्षण करणार असा सवाल त्यांनी केलाय. राफेलची कागदपत्रं चोरीला गेली होती असं सरकारने सुप्रीम कोर्टात सांगतलं होतं त्यावरून पवारांनी ही टीका केलीय.

शरद पवार काय म्हणाले?

हल्ल्याचं राजकारण

पुलवामात जवाची हत्या झाली, त्यावेळी सगळ्यांनी सरकार सोबत राहायची भूमिका घेतली. त्यात सरकारने राजकारण केलं. अभिनंदन ला अटक केली, आंतरराष्ट्रीय करारानुसार त्याची सुटका झाली, पण भाजप 56 इंचाची छाती असं सांगू लागली, अभिनंदन ला सोडले तर कुलभूषणला का नाही सोडले, 56 इंचाचा छाती गेली कुठं गेली?

राफेल शंकास्पद व्यवहार

राफेलच्या खरेदीबाबत मनमोहन सिंग यांच्या काळात वाटाघाटी झाल्या, त्यावेळी 350 कोटी किंमत होती. सरकार बदललं नवीन संरक्षण मंत्री आले आणि त्यांनी संसदेत 670 कोटी किंमत सांगितली. आणि विमान घ्यायच्या वेळी तर खासगी कंपन्यांना भागीदार करून 1660 कोटी देण्याचा प्रस्ताव झाला.

देशात विमान तयार करण्यासाठी सरकारच्या मालकीच्या 3 कंपनी आहेत, पण ते काम त्यांना न देता खासगी कंपनीला दिलं गेलं. ज्यांनी कागदी विमाने बनविले नाहीत त्यांना हे मोठं विमान बनवण्याचे काम दिलं. या खरेदीची चौकशी झाली पाहिजे की नाही असा प्रश्न त्यांनी मोदी यांच्या स्टाईलमध्ये त्यांना विचारला.

First published: March 26, 2019, 5:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading