Loksabha election 2019 नागपूरात रंगणार गुरू शिष्याची लढाई!

Loksabha election 2019 नागपूरात रंगणार गुरू शिष्याची लढाई!

2014मध्ये पटोले निवडूनही आले होते. गडकरी समर्थक अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र नंतर मोदींशी बिनसल्याने त्यांनी भाजपला राम राम केला आणि पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • Share this:

नागपूर 21 मार्च : नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर केलीय. तर काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे नागपूरात गुरु विरुद्ध शिष्य असा सामना रंघणार आहे.  केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना डावलून काँग्रेसने नागपुरातून पटोलेंना तिकीट दिलं आहे. पटोले हे मुळचे काँग्रेसचेच होते.

गडकरींनी पटोलेंना  भाजपध्ये आणले. 2014मध्ये ते चिमूरमधून निवडूनही आले होते. गडकरी समर्थक अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र नंतर मोदींशी बिनसल्याने त्यांनी भाजपला राम राम केला आणि पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांची गाठ कधी काळी गुरू असलेल्या नितीन गडकरींशी होणार आहे.

गडकरींची प्रतिक्रिया

माजी खासदार नाना पटोले यांना नागपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाल्याबद्दल गडकरींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नाना पटोले माझे मित्र आहेत, माझा त्यांना आशीर्वाद आहे असं गडकरी यांनी सांगितलं. मी कुणावरंही व्यक्तिगत टीका करणार नाही, मी केलेल्या कामावर मी मतं मागणार अशी प्रतिक्रियाही गडकरींनी व्यक्त केली.

मी यावेळेस मागच्या वर्षी पेक्षा जास्त  मतांनी निवडून येईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. ते येत्या 25 तारखेला अर्ज भरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

विलास मुत्तेमवार नाराज?

नागपूर लोकसभा मतदार संघातुन नितीन गडकरी हे विजयाचा दावा करत असले तरी ते यंदा तोंडघशी पडतील आणि काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍क्‍यानं निवडून येतील असा दावा काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी केलाय.

नितीन गडकरी यांनी 29 वर्ष निवडणुक लढण्याचं धाडस केलं नाही. गेल्यावेळी ते मोदी लाटेल निवडून आले. मात्र, आता ही लाट ओसरलीय. लोकांचा मूड बदललेला आहे. त्यामुळं मतदार गडकरींच्या विरोधात मतदार करतील, असा दावा मुत्तेमवार यांनी केलाय.

मतभेद नाहीत

नागपूरात काँग्रेस गटातटात विखुरलेली आहे त्यामुळं या गटातटाचा पटोले यांच्यावर परिणाम होईल का? या प्रश्‍नावर त्यांनी गटतट हे उमेदवारी मिळेपर्यंत सक्रीय असतात उमेदवारी जाहीर झाल्यावर सर्व गट शांत झाले आहे. त्यामुळं कुठलाही गट काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाण्याचं धाडस करणार नाही असा दावाही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 08:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading