सांगलीतही काँग्रेसमध्ये बंडखोरी, विशाल पाटील अर्ज दाखल करणार

सांगलीतही काँग्रेसमध्ये बंडखोरी, विशाल पाटील अर्ज दाखल करणार

वसंतदादा घराणे हे काँग्रेस मधेच राहणार आहे. त्यांचे सदस्य भाजपमध्ये कधीच जाणार नाहीत असं स्पष्टिकरण प्रतिक पाटील यांनी दिलंय.

  • Share this:

असिफ मुरसल, सांगली 25 मार्च : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लागलेलं बंडखोरीचं ग्रहण काही सुटता सुटेना. काँग्रेसला सोडचीठ्ठी देण्याची घोषणा प्रतिक पाटील यांनी रविवारी केली होती. त्यानंतर आता त्यांचे बंधू विशाल पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा प्रतिक पाटील यांनी केलीय. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहे.

राजू शेट्टी यांनी आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर सांगली स्वाभिमानीला मिळावी अशी मागणी शेट्टी यांनी केली होती. त्यामुळे ही जागा त्यांच्यासाठी सोडण्याचा काँग्रेसचा विचार आहे. या जागेवरचा हक्क गेल्याने नाराज झालेल्या प्रतिक पाटील यांनी सरळ काँग्रेसलाच सोडचिठ्ठी दिली देण्याची घोषणा केली. आणि आज आपले बंधू विशाल पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी घोषणा केली.

विशाल हा काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज दाखल करेल, पक्षाने त्यांची  उमेदवारी अंतिम करायची की नाही हे ठरवावे असं प्रतिक पाटील यांनी म्हटलं आहे. सांगलीत वसंतदादा घराण्याची ताकद असताना ही जागा दुसरीकडे का गेली असा सवालही त्यांनी केला.

भाजप प्रवेशावर काय म्हणाले प्रतिक पाटील?

वसंतदादा घराणे हे काँग्रेस मधेच राहणार आहे. त्यांचे सदस्य  भाजपमध्ये कधीच जाणार नाहीत असं स्पष्टिकरण प्रतिक पाटील यांनी दिलंय. पाटील यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

पाटील म्हणाले, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी काँग्रेस पक्षातून सुरुवात केली आणि काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यामध्ये बळकटीकरण केले. त्यांचाच वारसा घेऊन आम्ही काँग्रेस पक्षात आजपर्यंत आहोत. मात्र भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर आमची जवळीक आहे आणि त्यांची ही दादा घराण्यासोबत जवळीक आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर भाजपमध्ये जाण्याची कुठलीही चर्चा झाली नसल्याचे वसंतदादांचे नातू आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केले.

VIDEO: पवारांनी केलेल्या कौतुकामुळे उदयनराजे भोसले चक्क लाजले!

First published: March 25, 2019, 11:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading