भाजपने जुळवलेलं माढ्याचं गणित शरद पवारांचा 'हा' उमेदवार बिघडवणार का?

भाजपने जुळवलेलं माढ्याचं गणित शरद पवारांचा 'हा' उमेदवार बिघडवणार का?

माढ्यातून संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. हे संजयमामा शिंदे भाजपच्या पाठिंब्याने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते.

  • Share this:

मुंबई 22 मार्च : सोलापूर जिल्ह्यातला माढा मतदारसंघ हा गेले काही दिवस सलग चर्चेत होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इथून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली, त्यानंतर माघार घेतली. मग सोलापूर जिल्ह्यातलं मोठं नाव असलेल्या मोहिते पाटलांनी बंडखोरी केली. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली. भाजपचं पारडं जड होताना दिसताच शरद पवारांनी पुन्हा एकदा जोरदारी हालचाली करत माढ्याचा उमेदवार निश्चित केला आणि पुन्हा एकदा पारडं फिरताना दिसतंय.

माढ्यातून संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. हे संजयमामा शिंदे भाजपच्या पाठिंब्याने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. पण आता मात्र ते राष्ट्रवादीचं घड्याळ घेऊन लढणार आहेत. त्यांच्याविरोधात भाजप कोणता उमेदवार देतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कारण रणजितसिंह मोहिते पाटील ही जागा लढवण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. लोकसभेची निवडणूक लढण्यास रणजितसिंह उत्सुक नाहीत अशी माहिती आहे. ते राज्यसभा किंवा विधान परिषदेवर जाऊ शकतात असाही अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

पवारांची पॉवरफुल खेळी, उस्मानाबादेत ओमराजेंविरोधात राणा जगजितसिंह पाटील मैदानात

माढ्यात रंगणार रोहन देशमुख विरुद्ध संजय शिंदे असा सामना?

रोहन देशमुख माढ्यातील भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. रोहन हे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव तर संजय काकडे यांचे जावई आहेत.

संजयमामा शिंदे कोण?

शिंदे घराणं हे माढ्याच्या राजकारणात मोठं नाव राहिलं आहे. संजयमामा शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. त्यांना या पदासाठी भाजपने साथ दिली होती. भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून ते गेले काही दिवस लढत असले, तरी त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नव्हता. आता शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांची उमेदवारी शरद पवारांनी जाहीर केली.

माढ्यातल्या मोहिते पाटील घराण्याशी शिंदेंचं कधीच जमलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांचे संजयमामा शिंदे हे धाकटे बंधू. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून त्यांनी भाजप पुरस्कृत युतीत सामील झाले होते.   2014 ची विधानसभा निवडणूक लढले ते राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून. करमाळ्यातून लढत असताना त्यांचा पराभव झाला. माढ्यातून लोकसभा लढवणारा ताकदीचा उमेदवार म्हणूनच संजयमामांकडे भाजपनेही पाहिलं होतं. त्या वेळी शरद पवार स्वतः लोकसभेची निवडणूक माढ्यातून लढवणार अशी चर्चा होती. पण रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपत प्रवेश केला आणि माढ्याची गणितं बिघडली. शरद पवार यांनीसुद्धा लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आणि तेव्हापासून माढ्याचा तिढा काही सुटता सुटत नव्हता. भाजप आणि राष्ट्रावादी दोन्ही परस्परविरोधी पक्षांनी वेगवेगळ्या वेळी संजय शिंदेंवर विश्वास दाखवण्याची तयारी दाखवलेली होती, हीच संजयमामांची ताकद आहे, असं त्यांचे समर्थक सांगतात. ते इतर कुठल्या पक्षात फार रमले नाहीत. शिंदे हे मोहिते पाटील यांचे विरोधक तर अजित पवार यांचे समर्थक समजले जातात. अंतर्गत राजकारणामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी संजय शिंदेंना पाठिंबा देत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवून दिलं होतं. शिंदे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे माढ्याच्या राजकारणात आणखी चुरस वाढणार आहे.

काँगेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा पत्ता कट ?

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे राष्ट्रवादीत, माढ्याची चुरस वाढणार?

शिंदे जिल्हा परिषदेची निवडणूक लढताना अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यांना भाजपने पाठिंबा दिला होता. शिंदे हे मोहिते पाटील यांचे विरोधक तर अजित पवार यांचे समर्थक समजले जातात. अंतर्गत राजकारणामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी संजय शिंदेंना पाठिंबा देत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवून दिलं होतं. शिंदे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे माढ्याच्या राजकारणात आणखी चुरस वाढणार आहे.

कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश?

करमाळा

माढा

सांगोले

माळशिरस

फलटण

माण

माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदासंघांपैकी 3 राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेकडे प्रत्येक 1 मतदारसंघ आहे. त्यामुळे माढ्याची ही जागा राष्ट्रवादीसाठी तुलनेनं सोपी मानली जाते. 2009 साली पवारांनी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती.

मागच्या दोन निवडणुकांत काय होती स्थिती?

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल सव्वा तीन लाखांच्या फरकाने विजय मिळवला होता. तेव्हाही भाजपकडून त्यांच्याविरोधात सुभाष देशमुख हे मैदानात होते.

कुणाला किती मते मिळाली?

शरद पवार - 530,596

सुभाष देशमुख - 216,137

महादेव जानकर - 98,946

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी थेट निवडणुकीच्या मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढवत होते. मोदी लाटेचं मोठं आव्हान असतानाही या निवडणुकीत मोहिते पाटलांनी 'विजय' खेचून आणला होता. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी दिलेली कडवी झुंजही दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती.

कुणाला किती मते मिळाली?

विजयसिंह मोहिते पाटील - 489,989

सदाभाऊ खोत - 464,645

प्रतापसिंह मोहिते पाटील - 25,187

मतदार संख्या आणि स्वरूप

या लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत मतदारांची एकूण संख्या 17 लाख 27 हजार 322 एवढी होती. यातील 10 लाख 80 हजार 167 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

पुरूष मतदारांचं प्रमाण : 52.84 टक्के

स्त्री मतदारांचं प्रमाण : 47.16 टक्के

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न

पाणी आणि रस्ते हा या मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे. या लोकसभा मतदारसंघातील बहुतांश भागाला कायमच दुष्काळाला तोंड द्यावं लागतं. यंदाही हा भाग भीषण दुष्काळाने होरपळत आहे. जनावरे आणि शेतीसाठीच्या पाण्याशिवायच अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यांची स्थितीही बिकट असल्याचं चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याच प्रश्नांवर रान पेटण्याची शक्यता आहे.

VIDEO : संभाजी मालिकेनंतर पुढे काय? अमोल कोल्हेंची UNCUT मुलाखत

First published: March 22, 2019, 7:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading