विदर्भात आज मतदान..जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेने बजावला मतदानाचा हक्क

विदर्भात आज मतदान..जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेने बजावला मतदानाचा हक्क

विदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहीर या दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. गडकरी, अहीर या केंद्रीय मंत्र्यांसह माणिकराव ठाकरे, नाना पटोले, किशोर गजभिये यांसारख्या अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

  • Share this:

नागपूर, ११ एप्रिल- १७ व्या लोकसभेसाठी आज पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे. देशातल्या 20 राज्यांमध्ये एकूण 91 मतदारसंघात मतदान होत आहे. यात विदर्भातल्या सात जागांचा समावेश आहे. विदर्भातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. विदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहीर या दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. गडकरी, अहीर या केंद्रीय मंत्र्यांसह माणिकराव ठाकरे, नाना पटोले, किशोर गजभिये यांसारख्या अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गडचिरोलीच्या नक्षली भागात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- 2014 पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल- नितीन गडकरी

सकाळी ९ वाजेपर्यत मतदानाची टक्केवारी...

नागपूर- ११ टक्के

गडचिरोली- १५ टक्के

भंडारा-गोंदिया- ७ टक्के

चंद्रपूर- ६.१८ टक्के

यवतमाळ-वाशिम- ६.३१ टक्के

वर्धा- ७.३२ टक्के

- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचं आनंदवनमध्ये मतदान

- गोंदिया येथील 281 येथील कंट्रोल यूनिटमध्ये बिगाड झाल्याने मतदान थांबले

- नितीन गडकरी यांनी यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

- डाॅ. अभय आणि डाॅ. राणी बंग यांनी धानोरा तालुक्यात चातगावजवळ येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला

- माणिकराव ठाकरे यांनी आईचा आशीर्वाद घेऊन 'हरु' या जन्मगावी केले मतदान

- गडचिरोली जिल्हयातील मतदारांना सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंतच मतदान

- जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगे हिने बजावला मतदानाचा हक्क

- माओवाद्यांच्या हल्ल्यांची भीती लक्षात घेऊन गडचिरोलीत कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी हेलिकॉप्टरही तैनात ठेवलं असून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

- वर्धेच्या वायगाव मतदान केंद्रावर अर्धा तास उशिराने झाले मतदान सुरू; मशिन सिलिंग करायला लागला वेळ

वर्ध्याच्या सरस्वती विद्या मंदिर व वायगावच्या यशवंत विद्यालय या मतदान केंद्रावर सात वाजता मतदान सुरू न होता तब्बल अर्धा तास उशिराने मतदान सुरू झाले. या ठिकाणी मशिन सिलिंगला वेळ लागल्याने मतदार तोपर्यंत ताटकळत उभे होते. याठिकाणी प्रशासनातील ढिलाईचा प्रत्यय पहायला मिळाला.

- भंडारा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुधे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते एकतेच मतदार केंद्रावर दिसले. लोकांचा कल हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडे असून आपणच विजयी होणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

- वरोरा येथील मतदान केंद्रावर बाळु धानोरकर यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

अशा आहेत महत्त्वाच्या लढती...

वर्धा लोकसभा :

रामदास तडस,भाजपा - शिवसेना, रिपाइं युती

विरुद्ध

चारुलता टोकस, काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी

चंद्रपूर लोकसभा

हंसराज अहीर, भाजप

विरुद्ध

बाळु धानोरकर,काँग्रेस

गडचिरोली चिमुर लोकसभा

अशोक नेते भाजप

विरुद्ध

डॅा. नामदेव उसेंडी, काँग्रेस

First published: April 11, 2019, 10:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading