• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळताच मिलिंद देवरा म्हणाले...
  • VIDEO: मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळताच मिलिंद देवरा म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Mar 26, 2019 12:48 PM IST | Updated On: Mar 26, 2019 01:02 PM IST

    मुंबई, 26 मार्च : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस हायकमांडनं संजय निरुपम यांची उचलबांगडी करत मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्या खांद्यावर सोपवली आहे. मिलिंद देवरा हे स्वतः दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीनंतर मुंबईतील सहापैकी पाच मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. ''मी जनतेसमोर सकारात्मक अजेंडा ठेवला आहे. त्यामुळे मुंबईत सर्वसामान्यांना सर्वाधिक भेडसावणारा गृहनिर्माणचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावणार'' असं ते म्हणाले. खासदार निरुपम यांच्या नको तितक्या आक्रमक भूमिकेमुळे जे काँग्रेसचं नुकसान झाले आहे ते कसं सोडवणार? अशी विचारणा केली असता, निरुपम हे माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र येऊऩ निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी न्यूज18 लोकमतला सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading