शक्तिप्रदर्शनाचा रविवार, युती आणि महाआघाडीच्या जंगी सभा

शक्तिप्रदर्शनाचा रविवार, युती आणि महाआघाडीच्या जंगी सभा

रविवार हा शक्तिप्रदर्शनाचा दिवस ठरला. कराडमध्ये महाआघाडीची तर कोल्हापूरात युती जाहीर सभा झाली आणि प्रचाराचं रणशिंग फुंकलं गेलं.

  • Share this:

कराड/कोल्हापूर 24 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी महाआघाडीची रविवारी साताऱ्यात संयुक्त सभा सुरू आहे  या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी, जोगेंद्र कवाडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. तर कोल्हापूरमध्ये युतीही पहिली जाहीर सभा होतेय. या सभेला मुख्यमंत्री देवंद्र फडणीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. या दोन सभांमुळे रविवारचा दिवस हा शक्तिप्रदर्शनाचा दिवस ठरलाय.

कोल्हापूरात दाखल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि पूजा केली. त्यानंतर हे सर्व नेते सभा स्थळी दाखल झाले. लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान 11 एप्रिलला होणार आहे. या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार 25 मार्च हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहे. यात भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर,शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.

महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1

First published: March 24, 2019, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading