पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून बड्या नेत्याच्या नावाची चर्चा, दिल्लीत हालचालींना वेग

पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून बड्या नेत्याच्या नावाची चर्चा, दिल्लीत हालचालींना वेग

अंतिम निर्णय घेण्यासाठी आता दिल्लीमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती आहे. या बैठकीला काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हेदेखील उपस्थित आहेत.

  • Share this:

वैभव सोनवणे, नवी दिल्ली, 26 मार्च : पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर विचार केला जात आहे. तसंच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचंही नाव आघाडीवर आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आता दिल्लीमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती आहे. या बैठकीला काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हेदेखील उपस्थित आहेत.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली तरी काँग्रेसकडून पुण्याच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यासाठी पुण्यातून अनेक नेते इच्छुक आहेत. यामध्ये मोहन जोशी आणि अरविंद शिंदे या काँग्रेसच्या नेत्यांसह संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांचाही समावेश आहे.

इच्छुकांची गर्दी पाहता पुण्याच्या जागेसाठी सर्वांना मान्य होईल, अशा उमेदवार देणं काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ आली तरीही काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

दरम्यान, भाजपने मात्र पुणे मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. यावेळी भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कापलं आहे. भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

उमेदवार निवडीपूर्वी भाजपनं सर्व्हे केला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार अशी चर्चा होती. त्यानंतर आता भाजपनं अनिल शिरोळे यांचं तिकीट कापलं. गिरीश बापट गेली अनेक वर्ष खासदारकी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. अखेर अनिल शिरोळे यांना डच्चू देत पक्षाने बापट यांना संधी दिली आहे.

VIDEO: 'आम्ही जे 10 वर्षात केलं, ते सगळं मोदींनी पाच वर्षात संपवून टाकलं'

First published: March 26, 2019, 5:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading