काँग्रेसचा घोळ सुरूच, आता आणखी एक उमेदवार बदलणार?

काँग्रेसचा घोळ सुरूच, आता आणखी एक उमेदवार बदलणार?

या आधीही चंद्रपूरचा उमेदवार काँग्रेसने बदलला होता. तर औरंगाबादला अब्दुल सत्तार यांनीही काँग्रेसने ऑफर दिल्याचा दावा केला आहे.

  • Share this:

नागपूर 25 मार्च : विदर्भात सात जागांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मुदत संपण्याला काही तास राहिले असतानाच काँग्रेसच्या उमेदवाराचा आणखी एक घोळ पुढे आलाय. रामटेकमधून पक्षाने आपल्यालाच उमेदवारी दिल्याचा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी केलाय.  काँग्रेसने आधी जाहीर केलेल्या यादीत या जागेवरून किशोर गजभिये यांना उमेदवारी दिल्याची घोषणा केली होती.

पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे गजभिये हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. त्याच वेळी काँग्रेसचे नितीन राऊत हेही अर्ज भरण्यासाठी तिथे दाखल झाले. पक्षाने आपल्याला उमेदवारी देण्याचा दावा त्यांनी केला. या घटनेमुळे काँग्रेसपक्षातली बेदीली पुन्हा उघड झालीय.

या आधीही चंद्रपूरचा उमेदवार काँग्रेसने बदलला होता. तर औरंगाबादला अब्दुल सत्तार यांनीही काँग्रेसने ऑफर दिल्याचा दावा केला होता. त्यामुळे पक्षात नेमके काय चाललंय असा प्रश्न आता विचारला जातोय.

औरंगाबादमध्ये काय झालं?

काँग्रेसमधून राजीनामा दिलेले बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं आज स्पष्ट केलं. अशोक चव्हाण हेत माझे नेते आहेत असंही ते म्हणाले. पुढे कुठली भूमिका घ्यायची याचा निर्णय 29 मार्चला जाहीर करणार असंही त्यांनी सांगितलं. बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने काँग्रेसने उमेदवारी देण्याची ऑफर दिली असा खुलासाही त्यांनी केला. काँग्रेसने या ठिकाणी सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आहे.

सत्तार यांना औरंगाबादमधून लोकसभेचं तिकीट हवं होतं. पण तिकीट मिळालं नसल्याने त्यांनी काँग्रेसचा राजीनाम दिला होता. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या आधी काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवारही दोन वेळा बदलला आहे.

चंद्रपूरला काय झालं?

उमेदवारी अर्ज भरण्याला एक दिवस राहिलेला असताना काँग्रेसने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातला उमेदवार दुसऱ्यांदा बदलला आहे. आज जाहीर झालेल्या नव्या यादीत शिवसेनेचा राजीनामा दिलेले बाळू धानोरकर यांना अखेर काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून त्यांनी चंद्रपूरच्या उमेदवाराविषयी वाद असल्याची कबुली दिली होती.

भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर युतीची बाजू भक्कम झाली. भाजप सेनेचं मोठं आव्हान असताना काँग्रेसमध्ये मात्र उमेदवाराच्या नावावरून घोळ सुरू आहे. विदर्भातल्या चंद्रपूर मतदारसंघातून सुरूवातीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा मुलगा विशाल यांच्या नावाची चर्चा होती. त्यांचं नाव यादीतही होतं मात्र वेळेवर त्यांच्या ऐवजी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडेना उमेदवारी जाहीर झाली. बांगडे हे मुकूल वासनिक यांचे समर्थक मानले जातात.

First published: March 25, 2019, 3:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading