चंद्रपूरमधील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये कलह, विशाल मुत्तेमवारांच्या नावाला विरोध

चंद्रपूरमधील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये कलह, विशाल मुत्तेमवारांच्या नावाला विरोध

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांच्या नावाला पक्षातून जोरदार विरोध होत आहे.

  • Share this:

महेश तिवारी, चंद्रपूर, 20 मार्च : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये कलह सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांच्या नावाला पक्षातून जोरदार विरोध होत आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री जाहीर झालेल्या काँग्रेसच्या यादीत चंद्रपूरच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नाही.

काँग्रेसने चंद्रपूरमधील उमेदवाराची अधिकृत घोषणा केली नसली तरीही माजी केंद्रीय मंत्री विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी दिल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर चंद्रपुरात विशाल मुत्तेमवारांच्या उमेदवारीला जोरदार विरोध सुरू झाला.

'चंद्रपुरात नागपूरचा उमेदवार लादून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ही जागा भाजपलाा आयती दान करत आहेत,' असा आरोप काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी विशाल मुत्तेमवार यांचे नाव चर्चेत येताच त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे दीडशेपेक्षा जास्त तक्रारी केल्या. त्यानंतर काँग्रेसने या जागेबाबतचा निर्णय तुर्तास राखून ठेवला आहे.

त्यामुळे एकंदरीत काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेला कलह पाहता चंद्रपूरच्या जागेवर सर्वांना मान्य असलेला उमेदवार देताना पक्षाला नाकीनऊ येतील, असंच चित्र आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आता दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे. ठाकरे यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसंच मुंबई दक्षिण-मध्यमधून एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिर्डीतून भाऊसाहेब कांबळे, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकर,नंदुरबारमधून के.सी. पडवी,वर्ध्यातून चारुलता ठोकस आणि धुळ्यातून कुणाल रोहिदास पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

VIDEO : राज ठाकरेंनी केली नरेंद्र मोदी यांची मिमिक्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 08:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading