चंद्रपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसचा घोळ, दुसऱ्यांदा बदलला उमेदवार

चंद्रपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसचा घोळ, दुसऱ्यांदा बदलला उमेदवार

भाजप सेनेचं मोठं आव्हान असताना काँग्रेसमध्ये मात्र उमेदवाराच्या नावावरून घोळ सुरू आहे.

  • Share this:

महेश तिवारी, चंद्रपूर 24 मार्च : उमेदवारी अर्ज भरण्याला एक दिवस राहिलेला असताना काँग्रेसने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातला उमेदवार दुसऱ्यांदा बदलला आहे. आज जाहीर झालेल्या नव्या यादीत शिवसेनेचा राजीनामा दिलेले बाळू धानोरकर यांना अखेर काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून त्यांनी चंद्रपूरच्या उमेदवाराविषयी वाद असल्याची कबुली दिली होती.

भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर युतीची बाजू भक्कम झाली. भाजप सेनेचं मोठं आव्हान असताना काँग्रेसमध्ये मात्र उमेदवाराच्या नावावरून घोळ सुरू आहे. विदर्भातल्या चंद्रपूर मतदारसंघातून सुरूवातीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा मुलगा विशाल यांच्या नावाची चर्चा होती. त्यांचं नाव यादीतही होतं मात्र वेळेवर त्यांच्या ऐवजी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडेना उमेदवारी जाहीर झाली. बांगडे हे मुकूल वासनिक यांचे समर्थक मानले जातात.

प्रदेशाध्यक्षच नाराज

चंद्रपूरबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचही मत विचारात घेण्यात आलं नाही त्यामुळे त्यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली. चंद्रपूरसाठी अशोक चव्हाणांनी शिवसेनेचे वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर यांना राजीनामा द्यायला लावून आपल्याकडे खेचले होते. मात्र दिल्लीतून त्यांना डावलण्यात आल्याने अशोक चव्हाणही नाराज होते.

भाजप सेनेचं तगडं आव्हान असताना काँग्रेसचा घोळ सुरू आहे त्यामुळे युतीचं आव्हान कसं पेलणार असा प्रश्न आता विचारला जातोय.  विधानसभेतले  उपनेते विजय वडेट्टीवार आणि खुद्द बाळू धानोरकर शनिवारपासून दिल्लीत दाखल झाले होते सोशल मिडीयावरूनही बाळू धानोरकर समर्थकासह विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते अखेर आज कांग्रेस पक्षाने आपला उमेदवार बदलून आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या धानोरकरांना चंद्रपुरची उमेदवारी जाहीर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 06:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading