Loksabha election 2019 ...म्हणून गांधीनगरमधून अडवानी नव्हे तर शहा लढणार

Loksabha election 2019 ...म्हणून गांधीनगरमधून अडवानी नव्हे तर शहा लढणार

गांधीनगरच्या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी अमित शहांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती

  • Share this:

नवी दिल्ली 21 मार्च : भाजपची बहुप्रतिक्षित उमेदवार यादी जाहीर झाली आहे. यात गांधीनगरमधून लालकृष्ण अडवानी यांचा पत्ता कट झालाय. भाजपचे अध्यक्ष अमित शहा गांधीनगरमधून भाजपचे उमेदवार असणार आहेत. सलग सहावेळा जिंकूण येणारे अडवाणी यांचं वय 91 वर्षांचं आहे. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी अमित शहांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती.

भाजपच्या उमेदवार यादीला एवढा उशीर का ?

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार, अशी बातमी या आठवड्यात अनेकदा आली पण यादी काही जाहीर झाली नाही. होळीचं दहन झाल्यानंतरच्या शुभमुहूर्तावर ही यादी जाहीर करायची, असं पक्षाने ठरवलं होतं. या याद्या अंतिम करण्यासाठी पक्षाच्या बैठकाही सुरूच होत्या. पण काही ना काही कारणाने याला उशीर झाला.

भाजपला देशभरातल्या 200 उमेदवारांची यादी एकत्र जाहीर करायची असल्यामुळे याला विलंब झाला. या उमेदवार यादीवर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा लक्ष ठेवून होते. सगळीकडे होळीचा उत्साह असताना मोदी आणि अमित शहांची बुधवारी याबद्दल दोन तास बैठकही झाली होती.

उमेदवार यादी ठरवण्याच्या बैठका, चर्चा सुरू असतानाच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झालं. त्यामुळे ही चर्चा लांबणीवर पडली. त्यातच गोव्याच्या सरकारस्थापनेमध्येही भाजपचे बडे नेते गुंतलेले होते त्यामुळे या यादीला उशीर झाला.

काँग्रेसचे जाहीर झालेले उमेदवार

नंदूरबार - के. सी. पडवी, धुळे - कुणाल रोहिदास पाटील, वर्धा - चारूलता टोकस, यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे, दक्षिण-मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड, शिर्डी - भाऊसाहेब कांबळे, रत्नागिरी - नविनचंद्र बांदिवडेकर

नागपूर- नाना पाटोले, गडचिरोली- नामदेव उसेंडी, मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त, दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा, सोलापूर- सुशिलकुमार शिंदे

राष्ट्रवादीचे  जाहीर झालेले उमेदवार

बारामती- सुप्रिया सुळे,  सातारा- उदयनराजे भोसले,  कोल्हापूर - धनंजय महाडिक, रायगड- सुनील तटकरे, परभणी- राजेश विटेकर, मुंबई उत्तर पूर्व- संजय दिना पाटील, कल्याण- बाबाजी पाटील, ठाणे- आनंद परांजपे,

जळगाव- गुलाबराव देवकर, बुलडाणा- राजेंद्र शिंगणे, मावळ - पार्थ पवार, शिरूर - अमोल कोल्हे, नाशिक- समीर भुजबळ, बीड - बजरंग सोनावणे, दिंडोरी- धनराज महाले

First published: March 21, 2019, 7:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading