संजय शिंदेंची भाजपसोबत गद्दारी, त्यांना किंमत मोजावी लागेल - चंद्रकांत पाटील

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माढ्याचं सर्वच गणित बदलून गेलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2019 09:46 PM IST

संजय शिंदेंची भाजपसोबत गद्दारी, त्यांना किंमत मोजावी लागेल - चंद्रकांत पाटील

मुंबई 26 मार्च : भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले संजय शिंदे यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलीय. संजय मामांना भाजपशी गद्दारी केली आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल असा इशारा पाटील यांनी दिला.

मुळचे राष्ट्रवादीचेच असलेल्या संजय शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवलं. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते राष्ट्रवादीत परतले आणि माढ्याची उमेदवारीही मिळवली. शिंदे हे मोहिते पाटील घराण्याचे विरोधक असल्याने राष्ट्रवादीने त्यांच मन वळवून त्यांना आपल्या तंबूत ओढलं.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माढ्याचं सर्वच गणित बदलून गेलं होतं. त्यामुळे पवारांनी नवी खेळी करत शिंदेना आपल्याकडे खेचून आणलं. या खेळीने चिडलेल्या चंद्रकांतदादांनी संजय शिंदेंना इशारा दिल्याने माढ्याचं राजकारण आणखी रंगणार आहे.

शरद पवारांची घोषणा

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे राष्ट्रवादीचे माढ्याचे उमेदवार असतील अशी घोषणा शरद पवारांनी केल्याने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या माढ्यात भाजपचा उमेदवार कोण असेल याकडे आता लक्ष लागलंय. रणजितसिंह मोहिती पाटील यांच्या भाजप प्रवेशाने या मतदारसंघाचं सर्व गणितच बदलून गेलं असून निवडणुकीत जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Loading...

राष्ट्रवादीची खेळी

संजय हे माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे भाऊ आहेत. शिंदे हे मोहिते पाटील यांचे विरोधक तर अजित पवार यांचे समर्थक समजले जातात. अंतर्गत राजकारणामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी संजय शिंदेंना पाठिंबा देत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवून दिलं होतं. नव्या राजकीय समिकरणामुळे राष्ट्रवादीने त्यांचं मन वळवून पक्षात घेतलं आणि उमेदवारीही दिली. त्यामुळे राजकीय गणित बदलणार आहे. या बदलांमध्ये माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचंही नाव मागे पडलं.

रणजितसिंह मोहिते पाटील इच्छुक नाहीत

राष्ट्रवादीला धक्का देत भाजपवासी झालेले रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे माढ्याचे उमेदवार असतील असं बोललं जात होतं. मात्र लोकसभेची निवडणुक लढण्यास रणजितसिंह उत्सुक नाहीत अशी माहिती आहे. ते राज्यसभा किंवा विधान परिषदेवर जाऊ शकतात असाही अंदाज व्यक्त करण्यात येतोय.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 09:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...