पुणे, 14 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आता जवळपास निश्चित झाली आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदार संघात खासदार अनिल शिरोळे आणि गिरीश बापट ही दोन नावे समोर असली तरी, लोकसभेचं तिकीट बापटांनाच मिळेल अशी चर्चा आहे. त्यावर न्यूज18 लोकमतशी बोलताना बापटांनी ''पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल,'' असं मत स्पष्ट केलंय.