काँग्रेसचे सेनापती अखेर मैदानात, अशोक चव्हाणांची उमेदवारी जाहीर

काँग्रेसचे सेनापती अखेर मैदानात, अशोक चव्हाणांची उमेदवारी जाहीर

काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा देशभरातील एकूण 38 जणांची नाव जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातून फक्त अशोक चव्हाण यांच्याच नावाची घोषणा झाली आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई, 24 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडू राज्यातील तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा देशभरातील एकूण 38 जणांची नाव जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातून फक्त अशोक चव्हाण यांच्याच नावाची घोषणा झाली आहे.

अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर झाल्यामुळे नांदेडमध्ये चव्हाण विरुद्ध भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांची थेट लढत पाहण्यास मिळणार आहे.

काँग्रेसकडून कर्नाटकमध्ये 18, मध्य प्रदेश 9, मनिपूर 2, उत्तराखंड 5 आणि उत्तर प्रदेशमधून 3 जागांची घोषणा करण्यात आली आहे.

नांदेडमधून स्वत: निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाण फारसे अनुकूल नव्हते. नांदेड लोकसभेऐवजी विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना रस होता. पण प्रदेशाध्यक्ष चव्हाण हेच निवडणुकीस उभे राहत नाही असा मेसेज जाईल. यातून काँग्रेस पक्षावर टीका होते, यामुळे चव्हाण यांनी निवडणूक लढवावी ही भूमिका काँग्रेस हायकमांडने घेतली होती. त्यामुळेच अशोक चव्हाण आता लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

अब्दुल सत्तारांची बंडखोरी

लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी न दिल्याने सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. 'मला लोकांमध्ये जाऊन नशीब अजमावयाचे आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणारच,' असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली आहे.

'मी कुणावरही नाराज नाही. मी औरंगाबादमधून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी काँग्रेसचा राजीनामा आधीच दिलेला आहे. आता काँग्रेस आमदार म्हणून बोलत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत देणार आहे,' अशी घोषणाही अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

VIDEO: बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रिया

First published: March 24, 2019, 7:27 AM IST

ताज्या बातम्या