पुण्याचा घोळ संपणार, या नेत्याला मिळणार काँग्रेसचं तिकीट?

पुण्याचा  घोळ संपणार, या नेत्याला मिळणार काँग्रेसचं तिकीट?

पुण्यातून कुणाला उमेदवारी द्यावी यावर काँग्रेसमध्ये बराच खल झाला आणि नंतर नाव निश्चित केलं गेलं.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे 27 मार्च : पुण्याचा उमेदवार निवडण्यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेला घोळ आता संपण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचं नाव काँग्रेसने निश्चित केलं अशी माहिती सूत्रांनी दिलीय. गेली काही दिवस काँग्रेसचा उमेदवार कोण याचीच चर्चा सुरू होती. दिल्लीतल्या श्रेष्ठींनी आपलं मत शिंदे यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांची उमेदवारी पक्की झाली अशी माहिती सूत्रांनी दिली. रात्री उशीरा शिंदे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

बुधवारी दिल्लीत काँग्रस नेत्यांची बैठक झाली त्यात चर्चेनंतर अरविंद शिंदे यांच्या नावाला पसंती देण्यात आली.  दिल्लीतून दोन निरिक्षक पाठवून काँग्रेसने अंतर्गत सर्व्हेही केला होता. त्यानंतर अरविंद शिंदे, मोहन जोशी, प्रवीण गायकवाड या तिघांची नावे दिल्लीत पाठविण्यात आली होती.

भाजपचा प्रचार सुरू

भाजपने पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. बापट यांनी प्रचाराला सुरुवातही केलीय. मात्र काँग्रेसचा घोळ संपण्याची चिन्हे नाहीत. पुण्यात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या 14 मतदारसंघात निवडणूक होणार आहे.

भाजपचे धक्कातंत्र

इच्छुकांची गर्दी पाहता पुण्याच्या जागेसाठी सर्वांना मान्य होईल, असा उमेदवार देणं काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ आली तरीही काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला नव्हता.

यावेळी भाजपने धक्कातंत्राचा वापर करत पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कापलं आहे. भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

उमेदवार निवडीपूर्वी भाजपनं सर्व्हे केला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार अशी चर्चा होती. त्यानंतर आता भाजपनं अनिल शिरोळे यांचं तिकीट कापलं. गिरीश बापट गेली अनेक वर्ष खासदारकी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. अखेर अनिल शिरोळे यांना डच्चू देत पक्षाने बापट यांना संधी दिली आहे.

VIDEO स्कूटर अपघात पाहून राहुल गांधींनी थांबवला ताफा; जखमी पत्रकाराला स्वतःच्या कारमधून नेलं रुग्णालयात

First published: March 27, 2019, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading