शिरुर, 16 मार्च : ''सेलिब्रिटी ऐवजी एका सामान्य व्यक्तीला उमेदवारी देतील अस वाटलं होतं. मात्र, आता लढत अधिक सोप्पी झाली आहे,'' अशी खोचक टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर केली आहे. तसंच 'नेता हवा की अभिनेता हे कळण्या इतकी जनता सुज्ञ' असल्याचंही आढळरावांनी म्हटलंय. तर, ''नेता असो वा सेलिब्रेटी, तो कोण असावा आणि कसा असावा हे जनता ठरवते,'' अशा शब्दात डॉ. अमोल कोल्हेंनी आढळरावांच्या टीकेला प्रतिउत्तर दिलंय. ''यंदाची लढाई जनता विरूद्ध नेता अशी आहे. हमीभाव, वाहतूक कोंडी हे प्रश्न घेऊन जनता स्वतः आता रिंगणात उतरली आहे'' असंही कोल्हे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Adhalrao Patil, Amol kolhe, Loksabha election 2019, Shirur