ज्या प्रदेशाध्यक्षांचं दिल्लीत ऐकत नाही, त्यांचं मी कसं ऐकणार? - अब्दुल सत्तार

ज्या प्रदेशाध्यक्षांचं दिल्लीत ऐकत नाही, त्यांचं मी कसं ऐकणार? - अब्दुल सत्तार

'36 वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर न्याय मिळाला नाही याची खंत वाटत आहे.'

  • Share this:

मुंबई 24 मार्च : काँग्रेसचा राजीनामा दिलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार का अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर सत्तारांनी स्पष्टिकरण दिलंय, भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही विचार नाही असं ते म्हणाले. ज्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचेच दिल्लीत कुणी ऐकत नसेल तर मी कसे ऐकू? असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीविषयी खुलासा करताना त्यांनी सांगितलं की, ''मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, गेल्या काळात मुख्यमंत्र्यांनी जी मदत मला केली त्यासाठीचे आभार मानायला मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. मी सगळ्याच पक्षातील नेत्यांचे आभार मानणार आणि त्यांचे आशीर्वाद घेणार आहे.''

न्याय मिळाला नाही.

अशोक चव्हाणांच्या भूमिकेवरही त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मला अशोक चव्हाणांवर टीका करायची नाही, मी त्यांना धन्यवाद देतो. नेत्यांच्या विरोधात बोलणं माझ्या तोंडी चांगल वाटत नाही. मी औरंगाबादची जागा मागितली होती, मला जालना लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्यासाठी  काँग्रेसचा होता.

छत्तीस वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर न्याय मिळाला नाही याची खंत वाटतेय. त्यामुळे मी आता जनतेच्या दरबारात न्याय मागणार आहे. निवडणूकीनंतर काय करेल, कुठल्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही. सध्यातरी अपक्ष लढणार आहे. येत्या काळात  मुलाला सिल्लोड विधानसभेसाठी अपक्ष उभा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

First published: March 24, 2019, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading