लोकनाट्य तमाशाच्या महिला कलावंतांचे कपडे फाडून बेदम मारहाण

लोकनाट्य तमाशाच्या महिला कलावंतांचे कपडे फाडून बेदम मारहाण

लोकनाट्य तमाशाच्या तंबूत घुसून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने महिला कलावतांवर हल्ला केल्याचा घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर टोळक्याने महिलांचे कपडे फाडून त्यांना बेदम मारहाण केली.

  • Share this:

अहमदनगर, 26 एप्रिल- लोकनाट्य तमाशाच्या तंबूत घुसून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने महिला कलावतांवर हल्ला केल्याचा घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर टोळक्याने महिलांचे कपडे फाडून त्यांना बेदम मारहाण केली. श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथे यात्रेत हा धक्कादायक प्रकार घडला.

मिळालेली माहिती अशी की, लोणार येथे यात्रेनिमित्त शिवकन्या बडे यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान 20 ते 25 जणांच्या टोळके तंबूत घुसले. टोळक्याने 8 ते 10 महिलांचे अंगावरील कपडे फाडली आणि त्यांना बेदम मारहाण केली. तसेच तंबूचेही नुकसान केले. तमाशाच्या फडावर झालेल्या गोंधळामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

VIDEO: भिवंडीत उमेदवाराच्या कार चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

First published: April 26, 2019, 7:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading